एक्स्प्लोर

सरन्यायाधीशांविरोधात कट कारस्थान? वकिलाच्या दाव्याची सुप्रीम कोर्टाकडून गांभीर्याने दखल

सरन्यायाधीशांविरोधात आरोप लगावण्यासाठी मला दीड कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावाही उत्सव बॅन्स नावाच्या वकिलाने केला आहे. प्रकरण संशयास्पद असल्यामुळे त्याने नकार दिला आणि थोडी चौकशी केली

नवी दिल्ली : 'एक निष्ठावान सरन्यायाधीश आपलं नेटवर्क नेस्तनाभूत करत आहे, म्हणून काही जण या जजच्या विरोधातच कट कारस्थान रचायला सुरुवात करतात. देशाच्या सर्वात मोठ्या कोर्टात अशा 'फिक्सर'ची उपस्थिती आहे, जी न्यायालयाच्या निकालांवर परिणाम साधण्याचा प्रयत्न करत आहे' वकील उत्सव बॅन्स यांच्या दाव्यामुळे सुप्रीम कोर्ट आश्चर्यचकित झालं आहे. कोर्टाने या मुद्द्याच्या तपासावर चर्चा करण्यासाठी सीबीआय, आयबी आणि पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करणाऱ्या कोर्टाच्या माजी महिला कर्मचाऱ्याशी निगडीत हे प्रकरण आहे. विरोध केल्यामुळे आपल्याला नोकरीवरुन काढून टाकल्याचा दावा तिने केला आहे. संबंधित महिलेला डिसेंबर महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर, एका वकिलाने प्रतिज्ञापत्र दाखल करुन सरन्यायाधीशांविरोधात कट कारस्थान रचलं जात असल्याचा दावा केला आहे. सरन्यायाधीशांच्या कडक शिस्तीमुळे ज्यांचे गोरखधंदे उघडकीस आले, अशा लोकांनी हा कट रचल्याचं वकिलाचं म्हणणं आहे. सरन्यायाधीशांविरोधात आरोप लगावण्यासाठी मला दीड कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावाही उत्सव बॅन्स नावाच्या वकिलाने केला आहे. प्रकरण संशयास्पद असल्यामुळे त्याने नकार दिला आणि थोडी चौकशी केली. कोर्टात मनाजोगता निकाल लागू न शकल्यामुळे कॉर्पोरेट विश्वातील एक व्यक्ती आणि काही दलाल सरन्यायाधीशांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला समजलं, असं त्याने सांगितलं. सरन्यायाधीशांना पदावरुन पायउतार होण्यास भाग पाडण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं वकिलाचं म्हणणं आहे. VIDEO | सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप, रंजन गोगोईंकडून आरोपांचं खंडण | एबीपी माझा वकीलाच्या प्रतिज्ञापत्रावर आज सकाळी साडेदहा वाजता जस्टिस अरुण मिश्रा, रोहिंटन नरीमन आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकीलाला आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगण्यात आलं. वकीलाने सीलबंद लिफाफ्यात काही कागदपत्रं सुपूर्द केली. लिफाफ्यात काही सीसीटीव्ही फूटेज असून कट समजण्यास मदत होईल, असंही वकीलाने यावेळी सांगितलं. खंडपीठाने कागदपत्र पाहून हे प्रकरण गंभीर असल्याचं मत व्यक्त केलं. 'कोर्टात फिक्सर असणं, बाहेरच्या व्यक्तींशी त्यांनी केलेल्या हातमिळवणीचा दावा आश्चर्यकारक आहे. या पैलूंच्या तपासाची गरज आहे. सीबीआय निर्देशक, आयबी निर्देशक आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनी साडेबारा वाजता भेटावं. पुढील सुनावणी तीन वाजता होईल' असं न्यायाधीशांनी सकाळी सांगितलं. तीन वाजता कोर्ट वकीलाच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी एसआयटी गठित करण्याचे आदेश देईल, असं मानलं जात होतं. मात्र कोर्टाने वकिलाला आणखी काही प्रश्न विचारले. कट रचणाऱ्यांमध्ये तिघा माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याबद्दल कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं. यापैकी दोघा कर्मचाऱ्यांना उद्योगपती अनिल अंबानींच्या प्रकरणात आदेश बदलल्याबद्दल निलंबित करण्यात आलं होतं. अवमानना प्रकरणात अनिल अंबानींना कोर्टात हजर राहण्यास सूट दिल्याचा आदेश प्रकाशित केला होता, प्रत्यक्षात कोर्टाने अशी कोणतीही सूट दिली नव्हती. तिसरी कर्मचारी ही सरन्यायाधीशांवर आरोप करणारी महिला आहे. कोर्टाने वकिलाला आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगितलं आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पुन्हा यावर सुनावणी होईल. महिलेच्या आरोपांची चौकशी महिलेने सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांना कोर्टाने गांभीर्याने घेतलं आहे. नियमानुसार तक्रारीच्या तपासासाठी अंतर्गत समिती (इन हाऊस कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. तीन जजच्या या समितीमध्ये जस्टिस एस ए बोबडे, एन वी रमना आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार जस्टिस बोबडे हे दुसऱ्या, तर रमना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तक्रारदार महिलेला आपली बाजू मांडण्यासाठी उद्या बोलावलं आहे. कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलला या प्रकरणी कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget