एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चेक पेमेंटवर ‘SBI कार्ड’ दंड आकारणार

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाची घटक कंपनी एसबीआय कार्डने चेक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचा चेक वटवण्यासाठी एसबीआय कार्ड 100 रुपये शुल्क आकारणार आहे. पेमेंटची तारीख जवळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चेक जमा होतात. त्यावेळी विलंब शुल्कासंदर्भात वाद होतात. हे वाद टाळण्यासाठी आणि चेक चलन संपुष्टात आणण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हटलं आहे. 2 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या चेकवर हे शुल्क आकारलं जाईल. मात्र एसबीआयचे ग्राहक असल्यास आणि एसबीआयचाच धनादेश वटवायचा असल्यास त्यांना हे शुल्क लागू होणार नाही. मात्र इतर बँकेच्या ग्राहकांना शुल्क द्यावं लागेल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. चेक पेमेंट करणारे एकूण 8 टक्के ग्राहक आहेत. त्यापैकी 6 टक्के ग्राहक दोन हजार रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार करतात. त्यामुळे उर्वरित 2 टक्के ग्राहकांनाच शुल्क द्यावं लागले, असंही कंपनीने सांगितलं. एसबीआय कार्डची नोंद बँक न होता फायनान्स कंपनी म्हणून करण्यात आली आहे. परिणामी धनादेश वटवण्यासाठी ही कंपनी पैसे आकारते. बँकेच्या या निर्णयामुळे बिल भरणाऱ्यांना मोठा फटका बसेल, अशी भीती व्यक्त होत असली तरी त्यासाठी अन्य 14 पर्याय उपलब्ध आहेत, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे इतर बँकांच्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण स्टेट बँक इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या शाखा सहजासहजी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहक एसबीआयलाच पसंती देतात. मात्र या निर्णयानंतर इतर बँकांच्या ग्राहकांची अडचण वाढणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget