एक्स्प्लोर

Reserve Bank of India on Paytm : पेटीएमच्या 'त्या' विनंतीवर आरबीआयचा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विचार करण्याचा सल्ला

Reserve Bank of India on Paytm : पेटीएमची विनंती मान्य झाल्यास Paytm ला देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पेमेंट प्रक्रिया सुरू ठेवण्यास मार्ग मोकळा होईल. 

Reserve Bank of India on Paytm : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (National Payments Corporation of India) पेटीएम (Paytm) औपचारिकपणे वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रदाता (TPAP) बनण्यासाठी केलेल्या विनंतीचे परीक्षण करण्यास सांगितले आहे. पेटीएमची विनंती मान्य झाल्यास Paytm ला देशातील युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पेमेंट प्रक्रिया सुरू ठेवण्यास मार्ग मोकळा होईल. 

31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 15 मार्चपर्यंत आपला व्यवसाय बंद करण्यास सांगितले होते. यानंतर पेटीएमला जबर हादरा बसला आहे. "सध्याचे युझर्स नवीन हँडलवर समाधानकारकपणे स्थलांतरित होईपर्यंत या TPAP द्वारे कोणतेही नवीन वापरकर्ते जोडले जाणार नाहीत," असेही आरबीआयने म्हटले आहे.

मुदत 15 मार्चपर्यंत मुदत वाढवली

दरम्यान, 31 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास आणि कर्ज देण्यावर तात्काळ बंदी घातली. त्याचवेळी 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खाते, वॉलेट इत्यादींमध्ये पैसे जमा करण्यावर बंदी असेल असे सांगण्यात आले. आता या प्रकरणी आरबीआयने थोडा दिलासा दिला असून 29 फेब्रुवारीची मुदत 15 मार्चपर्यंत ढकलली आहे.

उर्वरित शिल्लक रकमेवर कोणतेही बंधन राहणार नाही

RBI FAQ नुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेली बँक खाती 15 मार्चनंतरही बंद होणार नाहीत. जर तुमचे पेटीएम पेमेंट्स बँकेत बचत किंवा चालू खाते उघडले असेल आणि त्यात पैसे असतील, तर तुम्ही 15 मार्चनंतरही काढू शकता जसे तुम्ही आतापर्यंत करत आहात. जोपर्यंत तुमच्या खात्यात शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही.

15 मार्चनंतर पगार मिळणार नाही

रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवून दिलेल्या सवलतीनुसार, 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेटमध्ये, बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात आला, तर तुम्हाला 15 मार्चनंतर अडचणी येऊ शकतात. कारण तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात जमा होणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही आगाऊ दुसऱ्या बँकेत नवीन खाते उघडावे आणि तुमच्या बँकेकडे त्याची माहिती अपडेट करावी.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget