एक्स्प्लोर
राजपथावर डौलाने तिरंगा फडकला
नवी दिल्ली: देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण करुन, तिरंग्याला सलामी दिली.
यावेळी राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख पाहुणे म्हणून अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद उपस्थित आहेत.
यानिमित्त दिल्लीतील राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडवण्यात आलं.
दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं ‘तेजस’ हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी झाले.
यूएई सैनिक
यंदा प्रजासत्ताक परेडमध्ये यूएईचे सैनिक सहभागी झाले. गेल्या वर्षीपासून परदेशी सैनिकांचा परेडमध्ये सहभागी होत आहे.
यापूर्वी फ्रान्सच्या सैनिकांनी राजपथावर शिस्तबद्ध संचलन केलं होतं.
एनएसजी कमांडो
आतापर्यंत प्रजासत्ताक दिवसाची सुरक्षा सांभाळणारे नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स अर्थात एनएसजीचे कमांडो पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.
दहशतवादविरोधी ऑपरेशन आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा हे एनएसजी कमांडोंचं प्रमुख काम असतं. मात्र आता हे कमांडो आज पहिल्यांदाच राजपथाच्या संचालनात सहभागी झाले.
स्वदेशी लढाऊ विमान तेजस
देशातच बनलेलं तेजस हे लढाऊ विमान परेडमध्ये सहभागी झालं. यापूर्वी देशी विमान म्हणून मारुत फ्लाय करत होतं. मात्र ते 25 वर्षांपूर्वीच निवृत्त झालं आहे.
आकाशातून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर मिसाईल डागण्याची क्षमता तेजस विमानात आहे. जमिनीपासून 50 हजार फूट उंच भरारी घेण्याची क्षमता तेजसमध्ये आहे.
तेजसशिवाय स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्रही आज संचलनात सहभागी झाले.
स्वदेशी धनुष तोफ
देशी बोफोर्स समजल्या जाणाऱ्या धनुष तोफही आजच्या संचालनात झळकणार आहे. 8 मीटर बॅरेलवाली तोफ बोफोर्सपेक्षाही अधिक, 38 किमीपर्यंत मारा करु शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement