Corona Vaccination | 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू
आतापर्यंत देशात एकूण 20 लाख 19 हजार 263 सत्रांच्या माध्यमातून कोविड लसीच्या 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 मात्रा देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होत आहे. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होईल.
कोरोनाची लक्षण असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट का येतो? असे झाल्यास काय करावे?
देशात 14 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार देशात एकूण 20 लाख 19 हजार 263 सत्रांच्या माध्यमातून कोविड लसीच्या 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 92 लाख 90 हजार 528 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 59 लाख 95 हजार 634 आरोग्य सेवा कर्मचारी, 1 कोटी 19 लाख 50 हजार 251 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 62 लाख 90 हजार 491 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाच्या 4 कोटी 96 लाख 55 हजार 753 लाभार्थांनी लसीची पहिली मात्रा आणि 77 लाख 19 हजार 730 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील,4 कोटी 76 लाख 83 हजार 792 लाभार्थी (पहिली मात्रा), 23 लाख 30 हजार 238 लाभार्थी (दुसरी मात्रा) इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्यात तिसऱ्या टप्प्यातही मोफत लस मिळणार?
राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे यावर चर्चा झाली होती. चांगली आणि स्वस्त 15 कोटी लसी विकत घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार सकारात्मक आहेत. यासाठी ग्लोबल टेंडर काढून 15 कोटी लस विकत घेणार आणि मोफत लसीकरण राज्य सरकार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
