एक्स्प्लोर
Advertisement
दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु
मुंबई : नोटाबंदीनंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. आता सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या नोटांची छपाई सुरु केली आहे.
दैनंदिन व्यवहारात देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून ही नोट चलनात आणणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. 'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. दोनशे रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय नोटाबंदीच्या आधीच घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे.
नोटाबंदी जाहीर झाली त्यावेळी म्हणजे 8 नोव्हेंबरला 1650 कोटी रुपयांच्या पाचशे रुपयांच्या नोटा होत्या. मात्र त्या रद्द झाल्यामुळे मोठा तुटवडा निर्माण झाला. दोन हजार किंवा पाचशे रुपयांच्या नोटांमुळे हा तुटवडा तितकासा घटला नव्हता. मात्र दोनशे रुपयांसारख्या कमी किमतीच्या नोटांमुळे ही तफावत कमी होण्याची आशा आहे.
दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाला आरबीआयच्या मंडळाने यापूर्वीच संमती दिली होती. दैनंदिन व्यवहार सुलभ करण्याच्या दृष्टीने सरकारने याबाबत चाचपणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement