एक्स्प्लोर

प्रणव मुखर्जींनंतर आता रतन टाटा संघाच्या मंचावर जाणार

पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर दिसतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं आहे.

मुंबई : पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर दिसतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं आहे. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावर गेल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. ‘नाना पालकर स्मृती समितीने 24 ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात रतन टाटा आणि मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. ही समिती टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांना मदत करते,’ अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. ‘नाना पालकर स्मृती समिती करत असलेल्या कामाबद्दल रतन टाटा यांना माहिती आहे,’असंही संघाचा पदाधिकारी म्हणाला. ‘रतन टाटा जर या कार्यक्रमाला जाणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिय विषय आहे,’ असं म्हणत टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमाबद्दल बोलण्यास नकार दिला. ‘आमच्या समितीचे संस्थापक नाना पालकर यांचे शताब्दी वर्ष आहे, तसंच आमच्या संघटनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आम्ही रतन टाटांशी संपर्क केला आहे. पण त्यांनी अजूनही आमचं निमंत्रण स्वीकारलं नाही आणि नकारही दिलेला नाही. यामुळे आम्ही आशावादी आहोत,’ असं नाना पालकर स्मृती समितीच्या एका सचिवाने सांगितलं आहे. रतन टाटांची  2016 साली संघ मुख्यालयाला भेट आपल्या 79 व्या वाढदिवसादिवशी रतन टाटांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. ही शिष्टाचार भेट आहे, असं त्यावेळी टाटांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रणवदांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. संघाच्या या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी राष्ट्र आणि राष्ट्रवाद याविषयीचे आपले विचार स्पष्ट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आजपासून तुमच्या खिशाला बसणार कात्री, तिकीटात नेमकी किती झाली वाढ? 
विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आजपासून तुमच्या खिशाला बसणार कात्री, तिकीटात नेमकी किती झाली वाढ? 
Delhi Protest : राहुल गांधींना अडवण्यासाठी मोठा फौजफाटा, गनिमी काव्याने भाऊ-बहीण आयोगापासून 300 मीटरवरील आकाशवाणी भवनात शिरले, दिल्लीत राडा
राहुल गांधींना अडवण्यासाठी मोठा फौजफाटा, गनिमी काव्याने भाऊ-बहीण आयोगापासून 300 मीटरवरील आकाशवाणी भवनात शिरले, दिल्लीत राडा
Delhi Protest : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली
बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Embed widget