एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रामनवमीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचं वातावरण
रामनवमीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. शिर्डीमध्ये तीन दिवसीय उत्सव सुरू आहे. तर अयोध्येतही रामनवमीच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिर्डी/ अयोध्या : रामनवमीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. शिर्डीमध्ये तीन दिवसीय उत्सव सुरू आहे. तर अयोध्येतही रामनवमीच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिर्डीतील रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्यानं साईंच्या दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुलं राहणार आहे. राज्यभरातून पायी चालत आलेल्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
साईभक्तांच्या सुरक्षेची, राहण्याची, भोजनाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी नाचवत हा उत्सव साजरा केला जात असल्यानं, रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली.
तर दुसरीकडे अयोध्येतही रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी अयोध्येतील हनुमानगढीवर भक्तांची मोठी गर्दी केली होती. शेकडो रामभक्तांनी हनुमानगढीवर येऊन हनुमानाचे दर्शन घेतले, आणि पूजा केली.
त्याशिवाय, अयोध्येतील विविध मठांमध्येही रामजन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त मठांमध्ये रामजन्मोत्सव कार्यक्रमासोबतच प्रवचन-किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी एटीएस आणि आरएएफच्या तुकड्या अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय, ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्हीच्या मदतीनेही सर्वत्र नजर ठेवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
Advertisement