एक्स्प्लोर
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारिवलनवर तुरुंगात हल्ला
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या एजी पेरारीवलन याच्यावर तुरुंगातच हल्ला झाल्याची माहिती आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या मध्यवर्ती तुरुंगात सहकैद्याने त्याच्यावर हल्ला केला.
राजेश नावाच्या कैद्याने 44 वर्षीय पेरारीवलनवर हल्ला केला. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचं कारण आणि इतर तपशील उघड करण्यास जेल प्रशासनाने नकार दिला आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु आहे.
राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी सुसाईड बॉम्बने हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारिवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रवीचंद्रन या सात जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सातही मारेकऱ्यांची सुटका करण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला होता. तामिळनाडू सरकारने दोन वर्षात दुसऱ्यांदा केंद्र सरकारला पत्र लिहून सातही मारेकऱ्यांच्या शिक्षेवर पुनर्विचार करुन त्यांची सुटका करण्याची विनंती केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement