एक्स्प्लोर
Advertisement
राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांकडूनच मोदींच्या स्वच्छता अभियानाला हरताळ
राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांचे उघड्यावर लघुशंका करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
नवी दिल्ली : एकीकडे पंतप्रधान मोदींनी देशातून अस्वच्छता हद्दपार करण्यासाठी ‘स्वच्छ भारत मोहीम’ सुरु केली आहे. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री या अभियानाला हरताळ फासत आहेत. कारण, राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांचे उघड्यावर लघुशंका करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
राजस्थानमध्ये सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्याकडून 200 रुपयाचा दंड वसूल केला जातो. पण राज्याचे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचेच उघड्यावर लघुशंका करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. या प्रकरणी त्यांना माध्यमांनी विचारला असता, त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच, हा काही मुद्दा नसल्याचं ते यावेळी म्हाणाले.
तर दुसरीकडे यावरुन काँग्रेसने भाजवर निशाणा साधला आहे. काँग्रेस उपाध्यक्षा अर्चना शर्मा यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “स्वच्छ भारत अभियानावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे जबाबदार नेते आपल्या कृतीतून समाजाला वाईट संदेश देत आहेत.” असं शर्मा यांनी म्हटलं.
शर्मा या ढोलपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जात होत्या. त्यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ ही कृती करताना दिसले. पण त्यावेळी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचल्याने, याचे फोटो काढता आले नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, राजस्थानमध्ये नुकतेच लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement