पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता मात्र बॅकफुटवर : राहुल गांधी
पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळताना दिसून आले. आता ते बँकफुटवर खेळत आहेत. त्यांना पुन्हा फ्रंटफुटवर यावं लागेल, असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली असून ते म्हणाले की, 'लॉकडाऊनचा चौथा टप्पा फेल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. परंतु, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला त्यांची पुढची रणनिती काय आहे, हे सांगणं आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळताना दिसून आले. आता ते बँकफुटवर खेळत आहेत. त्यांना पुन्हा फ्रंटफुटवर यावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
देशाला जाणून घेणं गरजेचं आहे की, सरकारची पुढिल रणनिती काय : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'जे होणं गरजेचं होतं. ते अजिबात झालं नाही. त्यामुळे देशाला जाणून घेणं गरजेचं आहे की, त्यांची पुढची रणनिती काय असणार आहे. लॉकडाऊन लागू होऊन जवळपास 60 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले, 'प्रवाशी मजूर त्रासले आहेत. सरकार त्यांच्या अडचणी कशा दूर करणार आहेत?'
पाहा व्हिडीओ : ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत : खासदार राहुल गांधी
सरकारने लोकांना पैसे देणं गरजेचं आहे : राहुल गांधी
मोदी सरकार विरोधी पक्षांना गांभिर्याने घेत नाही? या प्रश्नावर राहुल गांधी यांनी सांगितलं की, आमचं काम शासनावर दबाव टाकणं आहे. मी फेब्रुवारीमध्येच सांगितलं होतं की, परिस्थिती आणखी घातक होणार आहे.' रोजगारा संदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'सरकारला आर्थिक बाजू सावरण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. सरकारने लोकांना पैसे देणं गरजेचं आहे. त्यामुळे गरीबांच्या खात्यांमध्ये 7500 रुपये महिना पैसे ट्रान्सफर करणं आवश्यक आहे.'
ही राजकीय नाही, माझी चिंता आहे : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, 'सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज संदर्भात अनेक प्रेस कॉन्फरन्स झाल्या, आम्हाला फार आशा होती. पंतप्रधानांनी सांगितलेलं की, जीडीपीचा 10 टक्के असणार आहे. वास्तविक पाहता हे पॅकेज जीडीपीच्या 1 टक्क्याहूनही कमी आहे. त्यातही जास्तीत जास्त रक्कम कर्जाची आहे, रोख नाही.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मजूरांची, MSMEs ची मदत कसे करणार? हे राजकीय नाही, तर माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. आजार वाढतच जात आहे. त्यामुळे हा प्रश्न मी उपस्थित करत आहे.'
संबंधित बातम्या :
भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 6535 नवे रुग्ण, तर आतापर्यंत 4167 लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रापेक्षा गुजरातला 303 अधिक ट्रेन; गुजरातमधील मजुरांची संख्या जास्त? महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या; उद्धव ठाकरेंना रेल्वेमंत्र्यांचं उत्तर देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार : डॉ. हर्षवर्धन