एक्स्प्लोर

मोदीजी, पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही : राहुल गांधी

गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीआधी कॅश स्कँडलवर वाद सुरु असतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका सभेला संबोधित केलं. पैशांनी गुजराचचा आवाज विकत घेता येणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी जय भीमच्या नाऱ्यासह भाषणाची सुरुवात करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना गुजरातमध्ये 5 ते 10 उद्योजकांची सरकार असल्याचं म्हटलं. तर गुजरातमधील समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. गुजरातमध्ये 30 लाख तरुण बेरोजगार राहुल गांधी म्हणाले की, "22 वर्षात गुजरातमध्ये जनतेचं सरकार स्थापन झालेलं नाही. यामुळे गुजरातमध्ये 30 लाख तरुण बेरोजगार आहेत." गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही गुजरातमधील कँश स्कँडलवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "पैशांनी गुजरातचा आवाज विकत घेता येणार नाही. पंतप्रधान मोदी 'मन की बात' करतात, पण मला गुजरातच्या 'मन की बात' सांगायची आहे. गुजरातच्या तरुणांना शिक्षण हवंय, पण गुजरातचं सरकार 5 ते 10 उद्योजकांच्या हातात दिलं आहे." 'मेक इन इंडिया' फेल! "गुजरातमध्ये केवळ श्रीमंतांचं कर्ज माफ होतं, गरिबांचं नाही. मल्ल्याचं कर्ज कमी करण्यावर चर्चा सुरु आहे," असं राहुल गांधी म्हणाले. शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, "कॉलेजमध्ये 10 ते 15 लाख रुपये मागितले जातात. नॅनो कार बनवण्यासाठी 30 ते 35 हजार कोटी रुपये एका कंपनीला देण्यात आले, पण त्या पैशांमधून किती नॅनो कार बनवल्या?," असा सवालही काँग्रेस उपाध्यक्षांनी मोदींना विचारला आहे. "या पैशांमधून गुजरातमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं, पण तुम्ही त्यांचा आवाज ऐकला नाही, असंही ते म्हणाले. देशातील 'मेक इन इंडिया' हा उपक्रम फेल झाला आहे." "संपूर्ण देशाचा बजेट द्या, संपूर्ण जगाचा पैसा लावा, पण गुजरातचा आवाज दाबू शकत नाही," असंही राहुल गांधीं नमूद केलं. जीएसटी आणि जय शाहवर वार या सभेदरम्यान, राहुल गांधींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाचें पुत्र जय शाह यांच्या प्रकरणातही हल्लाबोल केला. "न खाऊंगा न खाने दूंगा, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी या प्रकरणावर अजूनही मौन बाळगलं आहे. जय शाहच्या प्रकरणात ते काही बोलणार नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. यासोबतच राहुल गांधी नोटाबंदबाबर सरकारला लक्ष्य केलं आहे. "नोटाबंदीच्या 5-6 दिवसात आपल्या चुकीची जाणीव झाली होती. नोटाबंदीतून मोदींनी अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली," असा घणाघात त्यांनी केला. राहुल गांधींनी यावेळी जीएसटीवरुनही सरकारवर हल्लाबोल केला. "जीएसटी म्हणजे गब्बर सिंह टॅक्स असून देशातील जनतेवर तो जबरदस्तीने थोपवला आहे," असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधीचं भाषण
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Arya Encounter: रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar-Adani Meet: शरद पवारांची Gautam Adani'ंशी पुन्हा भेट, शिंदेच्या नातीच्या प्री-वेडिंगमध्ये राजकीय चर्चांना उधाण
Mahayuti Infighting: 'फसवणे हा त्यांचा धंदा', आमदार Mahendra Dalvi यांचा खासदार Sunil Tatkare यांच्यावर हल्लाबोल
Bhima Koregaon Probe: 'नोटीसकडे दुर्लक्ष का?', आयोगाचा Uddhav Thackeray यांना सवाल, कारवाईचा इशारा
Hawa Mahal Files: 'खंडणीच्या पैशातून Bachchu Kadu नी हवा महल उभारला', BJP आमदार Pravin Tayde यांचा गंभीर आरोप.
Akola Riots: 'पोलिसाला धर्म नसतो', SIT मध्ये Hindu-Muslim अधिकारी नेमण्याच्या SC निर्णयाला राज्य सरकारचं आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Arya Encounter: रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Embed widget