'जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना' राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी चीनकडून करण्यात येणाऱ्या आयातीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ देखील गांधी यांनी शेअर केला आहे.
Record import from China: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर त्यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अर्थसंकल्पावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना चीनचा संदर्भ दिला आहे. 'जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना' असे ट्वीट करत राहुल गांधी चीनकडून भारत करत असलेल्या आयातीवर टीका केली आहे.
दरम्यान, राहु गांधी यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी यूपीए सरकार आणि एनडीए सरकारची आकडेवारी दिली आहे. यामध्ये 2014 पासून चीनमधून आयात वेगाने कशी वाढत आहे हे सांगितले आहे. तसेच राहुल गांधी यांनी संसदेत दिलेल्या भाषणाची एक क्लीप देखील त्यांनी शेअर केली आहे. 50 वर्षानंतर प्रथमच देशात एवढी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. मेक इन इंडियाची चर्चा केली मात्र, युवकांना रोजगार काही मिळाला नाही. गेल्या 7 वर्षांमध्ये सरकारने लहान उद्योगांवर आक्रमण केले आहे, असंघटीत क्षेत्र सरकारने संपवले असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
JUMLA for India
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2022
JOBS for China!
Modi Government has destroyed the Unorganised Sector and MSMEs that create the most jobs.
Result: 'Make In India' is now 'Buy from China' pic.twitter.com/nZRUsYxgkP
दरम्यान, राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताने चीनकडून किती आयात केली यासंदर्भातील माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी 2014 नंतर देशात चीनकडून होणारी आयात वेगाने वाढत आहे. 2021 मध्ये चीनकडून होणाऱ्या आयातीत 46 टक्क्यांची वढ झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यानंतर देशात आत्तापर्यंतचे बेरोजगारीचे सगळे रेकॉर्ड तोडले आहे. मोदी सरकारच्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढले असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.
सरकारने देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार करुन केवळ दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांना श्रीमंत केलं आहे. देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, असंही राहुल गांधी यांनी संसदेत म्हटले होते. एका व्यक्तीकडे खनिजं, तेल, वीज असं जे काही आहे नाही ते दिलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग देण्यात आले आहेत. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत.राहुल गांधी यांनी बरोजगारीचा महत्त्वाचा मुद्दा मांडताना मागील एका वर्षात तीन कोटी युवकांचे रोजगार हिरावले गेले असल्याची टीका केली. तसंच हे सरकार रोजगार देण्याची गोष्ट करत आहे, पण वस्तुस्थिती म्हणजे गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधीक बेरोजगारी सध्या देशात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: