एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचं देशवासियांना संबोधन; कोरोना महामारी, गलवान खोरं, राम मंदिराचा उल्लेख
74 व्या स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानी देशवासियांना संबोधन केलं आहे.
नवी दिल्ली : 74 व्या स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. गलवान खोऱ्यात देशासाठी बलदान देणाऱ्या पराक्रमी जवानांना त्यांनी नमन केले. आपल्या सीमेचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी झटणारे सैन्य दल, पोलीस आणि निमलष्करी दलांचा आम्हाला अभिमान आहे.” असंही कोविंद यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं ते म्हणाले.
“यावर्षी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे,” असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
“आज जेव्हा संपूर्ण जगासमोर एक सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे, त्यावेळी सर्वांना त्याचा एकत्रित सामना करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेजारी राष्ट्रानं त्यांच्या विस्तारवादी भूमिकेचा अवलंबक करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं,” असंही राष्ट्रपती म्हणाले. भारतमातेच्या त्या सुपुत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. संपूर्ण देश गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन करतो.
Amit Shah Beats Corona | अमित शाह यांची कोरोनावर मात
देश डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा ऋणी
कोरोना सारख्या महामारीवर देशाने चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवले आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला आहे. जगाने अनुकरण करावा असा आदर्श यातून भारताने घालून दिला आहे. देश सर्व डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्चचाऱ्यांची ऋणी आहे. जे कोरोना संकट काळात आघाडीवर लढत आहे.
राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात
केवळ दहा दिवसांपूर्वीच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ झाला ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. देशवासीयांनी मोठ्या कालावधीसाठी धैर्य आणि संयम बाळगला आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला. श्रीराम जन्मभूमीशी संबंधित प्रकरण योग्य न्याय प्रक्रियेअंतर्गतच सोडवण्यात आलं. सर्वांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मानानं स्वीकार केला. शांती, अहिंसा आणि प्रम भावनेचं उदाहरण संपूर्ण जगासमोर आणलं. यासाठी सर्वांचंच मी अभिनंदन करतो,” असंही ते म्हणाले.
Amit Shah Corona Negative | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची कोरोनावर मात, ट्वीट करत माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement