PNG Price Hike : सहा महिन्यात 50 टक्क्यांनी वाढला पीएनजी; 'असं' कोलमडणार तुमचे किचन बजेट
PNG Hike Update : गेल्या सहा महिन्यात पीएनजीच्या दरात जवळपास 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2021 अगोदर पीएनजीचे दर 30.91 प्रति एमसीएम (standard cubic meters) मध्ये इंद्रप्रस्थ गॅस राजधानी दिल्लीतमध्ये पुरवठा करते.
PNG Price Hike : इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस अर्थात इंद्रप्रस्थ गॅस पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. एका दिवसात 10 टक्के दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यााच फटका सर्वसामान्यांना बसला आहे. अगोदरच महागाईमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे त्यानंतर आता पीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामन्य नागरिक हैराण झाले आहे.
6 महिन्यात पीएनजीच्या दरात 50 टक्के वाढ
गेल्या सहा महिन्यात पीएनजीच्या दरात जवळपास 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2021 अगोदर पीएनजीचे दर 30.91 प्रति एमसीएम (standard cubic meters) मध्ये इंद्रप्रस्थ गॅस राजधानी दिल्लीतमध्ये पुरवठा करते. 14 एप्रिल 2022 ला पीएनजीच्या नव्या किंमती वाढवून 45.86 रुपये प्रति एमसीएम झाला आहे.
पीएनजी दरवाढीमुळे बिघडले किचनचे बजेट
पीएनजीच्या दरवाढीमुळे कसा तुमच्या किचन बजेटवर परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया. समजा 1 ऑक्टोबर अगोदर 60 दिवसांसाठी म्हणजे दोन महिन्यात जर तुम्ही 25 एससीएम पीएनजीचा वापर करत होते. तर तुम्हाला 772.72 रुपये आणि त्यामध्ये 6 टक्के वॅट लावत 812 रुपये पीएनजी बील भरावे लागत होते. मात्र आता 14 एप्रिलनंतर पीएनजीच्या नव्या किंमतीनुसार आता तुम्हाला 1146.50 रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये 5 टक्के वॅट जोडला तर तब्बल 1204 रूपये मोजावे लागणार आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 अगोदर किचनमधील गॅससाठी 400 रुपये मोजावे लागत होते. तिथे आता 600 रुपये खर्च करावे लागणार आहे.
देशात पीएनजीच्या माध्यमातून घराघरात गॅस पोहचवण्याची योजना करण्यात येत आहे. खेडेगावातील प्रत्येक घरात गॅस पोहचवण्याची ही योजना आहे. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी स्वस्त आहे. परंतु पीएनजीच्या वाढत्या दरामुळे स्वस्तात गॅस पोहचवण्याची योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.