PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशातील जनेला संबोधित करणार आहेत. पीएमओ ट्विटर हॅन्डलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. अशातच मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्षं लागलं आहे.
![PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार PM Narendra Modi will address the nation today at 4 pm PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/26133811/modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. परंतु, अद्याप मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे समजलेलं नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधतील. याव्यतिरिक्त असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात.
पीएमओ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करू देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या संबोधनाआधी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल भारत सरकारच्या वतीने उचलण्यात आलं आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सरकारच्या वतीने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
भारत आणि चीन यांच्या कमांडर स्तरावर चर्चा
आज भारत आणि चीन यांच्यामध्ये कमांडर स्तरावर तिसऱ्या टप्प्यात चर्चा होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ही बैठक सुरु होईल आणि यामध्ये दोन्ही देशांमधील एलएसीवर तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. याव्यतिरिक्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात भारत गस्त वाढवणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, यातून चीनला संदेश दिला जात आहे की, भारत आपल्या सीमांवर पूर्णपणे सतर्क आहे.
पाहा व्हिडीओ : भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले : पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं यााधीही देशाला संबोधन
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. याआधी सर्वात पहिल्यांदा मोदींनी 19 मार्च रोजी देशात 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लवण्याची घोषणा केली होती. सर्वात आधी लॉकडाऊन 25 मार्चपासून ते 14 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला होता.
आता रविवारी 28 जून रोजी मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमामधून देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर ठिक एक दिवसानंतर ते पुन्हा राष्ट्राला संबोधित करणार आहेत. अशातच पंतप्रधान काय घोषणा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह 59 अॅप्स बॅन
अनलॉक 2 : एक जुलै पासून काय चालू, काय बंद? केंद्राची नियमावली जारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)