एक्स्प्लोर

Unlock 2.0 | अनलॉक 2 : एक जुलै पासून काय चालू, काय बंद? केंद्राची नियमावली जारी

अनलॉक 2 अंतर्गत केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. यानुसार काही नियमांमध्ये शिथीलता देण्यात येणार आहे. तर काही गोष्टी राज्यावर सोपवण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचीही गरज आहे.

अनलॉक 2 ची नियमावली

  • या अगोदरचं घरगुती विमान उड्डाणांना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. याची संख्या आता वाढवण्यात येणार आहे.
  • नाईट कर्फ्यू मध्ये आता शिथीलता देण्यात येणार आहे. आता रात्री 10 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहिल. रात्री केवळ इंडस्ट्रियल यूनिट्स आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक करणारी वाहने, ट्रेन आणि विमानांना प्रवासाची मूभा असेल.
  • दुकानांमध्ये जागेनुसार एकाचवेळी पाच लोकांना प्रवेश देऊ शकतात. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सचं पालन करावे लागणार आहे.
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलैपासून उघडण्यात येतील. यासाठी वेगळ्या स्वरुपात गाईडलाईन्स देण्यात येणार आहे.
  • राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चेनंतर शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग संस्था 31 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत मर्यादित स्वरुपात होती. आता ती नियोजन पद्धतीने वाढवण्यात येणार आहे.

कंटेनमेंट झोनबाहेर खालील गोष्टींना बंदी असणार

  • मेट्रो, रेल्वे
  • चित्रपट गृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल आणि अशा प्रकारच्या अन्य सेवा बंद राहणार आहेत.
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, अॅकडमिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या गोष्टींना बंदी असणार आहे. या सर्व गोष्टींना सुरू करण्यासाठी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
  • 31 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू असणार आहे. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही, अशा ठिकाणी काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
  • राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही गोष्टींवर निर्बंध आणू शकते.
  • राज्याच्या आतमध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लोकांना येण्याजाण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात आले नाही.
  • आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे चालूच राहणार आहे.

Mission Begin Again 2 | महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा,पूर्वीचेच नियम कायम

 

महत्त्वाच्या बातम्या

लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
Rahul Gandhi : निशा साबळेनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, म्हणाले...
राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत म्हणाले... 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?  
दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?  

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Sugar price hike: इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
Ritu Tawde Mumbai Mayor: महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Embed widget