एक्स्प्लोर
Azim Premji | अझीम प्रेमजींची दरियादिली, 1125 कोटींची मदत करणार
कोरोनाविरोधातील लढाईसाठी उद्योग क्षेत्रातील अनेक हात पुढे येत आहेत. रिलायन्स, टाटानंतर आता आयटी कंपनी विप्रो आणि त्याचे संस्थापक अझीम प्रेमजी फाउंडेशनही मदतीसाठी पुढे आले आहेत.
मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईसाठी उद्योग क्षेत्रातील अनेक हात पुढे येत आहेत. रिलायन्स, टाटानंतर आता आयटी कंपनी विप्रो आणि त्याचे संस्थापक अझीम प्रेमजी फाउंडेशनही मदतीसाठी पुढे आले आहेत. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी 1125 कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही मदत पीएम केअर्सऐवजी फाऊंडेशनच देणार आहे.
विप्रोने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अझीम प्रेमजी फाउंडेशनने एकत्र येत मदत दिली आहे. यामध्ये मोठा वाटा प्रेमजी फाउंडेशनचा असेल. विप्रो लिमिटेड 100 कोटी देईल, विप्रो इंटरप्रायजेस 25 कोटी आणि फाउंडेशन 100 कोटी रुपये दान करतील. ही रक्कम वार्षिक सीएसआर रकमेपेक्षा वेगळी असून यासोबत अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या कल्याणकारी खर्चाव्यतिरिक्त आहे.
हा पैसा संसर्गजन्य परिसरातील लोकांची मदत, आराेग्य सुविधांवर खर्च केली जाईल. याची अंमलबजावणी प्रेमजी फाउंडेशनच्या 1600 कर्मचाऱ्यांची टीम करणार आहे.
अझीम प्रेमजी यांनी 50 हजार कोटींची संपत्ती दान करण्याची घोषणा केल्याचे खोटे वृत्त प्रकाशित झाले होते. अझीम प्रेमजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी यापूर्वीही ते मदत करत आले आहेत. आपल्या ताब्यात असलेले कंपनीचा 34 टक्के हिस्सा त्यांनी या पूर्वीच दान केला होता.
फॉर्ब्जनुसार त्यांची एकूण संपत्ती 5.2 अब्ज डॉलर म्हणजे 36 हजार कोटी इतकी आहे. आतापर्यंत त्यांनी 21 अब्ज डॉलर म्हणजे 1 लाख 47 हजार कोटी इतकी रक्कम दान केली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी उत्तर पूर्व भारतात त्यांनी उपक्रम सुरू केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement