एक्स्प्लोर
भाजपची टीम 'चौकीदार' सज्ज, मोदींसह भाजप नेत्यांंनी ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटचे नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे केले आहे. त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावले आहे.

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून देण्यात आलेल्या 'चौकीदार ही चोर हे' या घोषणेला उत्तर देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे केले आहे. त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्यानंतर आज मोदींसह इतर भाजप नेत्यांनी ट्विटरवर त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावत मोहीम उघडली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं आहे.Your Chowkidar is standing firm & serving the nation.
But, I am not alone. Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar. Everyone working hard for the progress of India is a Chowkidar. Today, every Indian is saying-#MainBhiChowkidar — Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 16, 2019



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
