पंतप्रधान मोदी जपानला जाणार, आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील
Shinzo Abe State Funeral: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानला भेट देणार आहेत. यावेळी ते 27 सप्टेंबर रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
Shinzo Abe State Funeral: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानला भेट देणार आहेत. यावेळी ते 27 सप्टेंबर रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. शिंजो आबे यांचे 8 जुलै रोजी निधन झाले. जपानच्या नारा शहरात त्यांच्यावर एका व्यक्तीने मागून गोळी झाडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात अपयश आलं. आबे यांच्यावर हा हल्ला झाला तेव्हा ते एका छोट्या जाहीर सभेला संबोधित करत होते. गोळी लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होत.
मोदी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांचीही भेट घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी त्यांच्या या दौऱ्यात पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि शिंजो आबे यांचे जवळचे सहकारी यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आबे यांच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. ते म्हणाले की, आबे यांनी आपले संपूर्ण आयुष्य जपान आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी समर्पित केले. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "माझ्या प्रिय मित्र शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ते एक सर्वोच्च जागतिक राजकारणी, एक उत्कृष्ट नेता आणि एक अद्भुत प्रशासक होते."
पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांची मैत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. शिंजो आबे यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींना खूप दुःख झाले. याचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये केला आहे. पंतप्रधानांनी लिहिले की, "मला आज त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो. क्योटो येथील तोजी मंदिराला भेट असो, शिंकासेनमध्ये एकत्र प्रवास करण्याचा आनंद असो, अहमदाबादमधील साबरमती आश्रम, काशीमधील गंगा असो. आरतीचा आध्यात्मिक प्रसंग असो किंवा टोकियोचा चहा समारंभ, ही संस्मरणीय क्षणांची यादी खूप मोठी आहे. पंतप्रधान मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, "माउंट फुजीच्या पायथ्याशी वसलेल्या अतिशय सुंदर यमनाशी प्रांतातील त्यांच्या घरी भेट देण्याची संधी मला मिळाली. तो क्षण मी कधीही विसरणार नाही. हा सन्मान मी नेहमी माझ्या हृदयात जपत राहीन."
इतर महत्वाच्या बातम्या:
New Delhi : मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम
मुस्लीम धर्मगुरु उमर अहमद इलियासींच्या मते सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता.. दिल्लीच्या मशिदीतील तासाभराच्या चर्चेनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार