(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुस्लीम धर्मगुरु उमर अहमद इलियासींच्या मते सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता.. दिल्लीच्या मशिदीतील तासाभराच्या चर्चेनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार
Mohan Bhagwat Masjid Visit : मुख्य इमाम इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला.
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी गुरुवारी दिल्लीमधील मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलयासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची तब्बल एक ते दीड तास बंद दाराआडा चर्चा झाली. मोहन भागवत यांच्यासोबतच्या भेटीनंतर डॉक्टर उमर अहमद इलयासी यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. त्याशिवाय दोन्ही धर्मियांचा डीएनए एकच असल्याचेही ते म्हणाले. मोहन भागवत यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नवी दिल्ली (Delhi) येथील कस्तूरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लीम नेत्यांशी चर्चा केली. मोहन भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉ. उमर अहमद इलयासी यांच्यासोबत चर्चा केली. याआधी मोहन भागवत यांनी माजी मुक्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी आणि दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली.
Mohan Bhagwat ji visited on my invitation today. He's 'rashtra-pita' & 'rashtra-rishi', a good message will go out from his visit. Our ways of worshipping god are different but biggest religion is humanity. We believe country comes first: Dr Ilyasi, Chief Imam,All India Imam Org https://t.co/RsYk7oIbHR pic.twitter.com/RtYNwfGWD7
— ANI (@ANI) September 22, 2022
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि परोपकारी सईद शेरवानी यांची आरएसएसच्या कार्यलायत झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. मोहन भागवत यांच्यासोबत त्यांची तब्बल दोन तास चर्चा झाली होती. सांप्रदायिक सलोखा मजबूत करणे आणि दोन्ही समाजाचे संबंध सुधारण्यावर व्यापक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी मुस्लीम संघटना जमीअत-उलेमा-ए-हिंद याचे नेता मौलाना अरशद मदनी यांनी 30 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीमध्ये झंडेवालान येथे असलेल्या आरएसएस कार्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती.
कश्मीरी नेत्यांसोबतही करु शकतात चर्चा -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत येणाऱ्या काही दिवसांत काश्मीरमधील काही मुस्लीम नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये निवडणुका पुन्हा सुरुवात झाल्यानंतर घाटीमध्ये शांतता राहण्याच्या दृष्टीने महत्वाची भेट मानली जात आहे.