एक्स्प्लोर
रोड शोदरम्यान सोनिया गांधी आजारी, पंतप्रधानांकडून विचारपूस

नवी दिल्ली: गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातील सत्तेतून दूर राहिलेल्या काँग्रेसला पुन्हा चार्ज करण्यासाठी आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रोड शो केला. जवळपास सात किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर सोनिया गांधींची तब्येत अचानक खराब झाली. त्यामुळे त्यांना पुढील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले. तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांनी रोड शो मध्येच सोडून, तत्काळ वाराणसी विमानतळाचा मार्ग पकडला. काँग्रेस नेत्यांच्या मते सोनिया गांधी आज रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत. ''तब्येत अचानक बिघडल्याने मला वाराणसीतील रोड शो अर्ध्यावरच सोडावा लागला. याचे मला अतिव दु:ख होत असून, मी लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा येणार असल्याचे,'' त्यांनी एक पत्रक काढून सांगितले. सोनिया गांधींची तब्येत खराब झाल्याची माहिती मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ ट्विट करून सोनिया गांधींना लवकर ठिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सोनिया गांधींची तब्येत अचानक खराब झाल्याने वाराणसीमध्ये आयोजित त्यांची सभाही रद्द करावी लागली, तसेच त्यांना विश्वनाथ मंदिरात जाण्याची इच्छाही अपूर्ण राहिली.Heard about Sonia ji’s ill health during her Varanasi visit today. I pray for her quick recovery and good health.
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2016
आणखी वाचा























