Partition Horrors Remembrance Day : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! 14 ऑगस्ट 'फाळणी वेदना स्मरणदिन' म्हणून साजरा होणार
ब्रिटिश राजवटीने 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान मुस्लिम देश म्हणून घोषित केला. मोठ्या दंगलीमुळे लाखो लोक विस्थापित झाले आणि कित्येक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मरणदिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी याचे कारणही दिले आहे. ते म्हणतात की या दिवशी आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना द्वेष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, 14 ऑगस्ट रोजी 'फाळणी वेदना स्मरणदिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये लिहलंय, "देशाच्या फाळणीची वेदना कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसेमुळे आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना विस्थापित व्हावे लागले आणि प्राणही गमवावे लागले. त्या लोकांचा संघर्ष आणि त्याग लक्षात ठेवून. 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मरणदिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #PartitionHorrorsRemembranceDay चा हा दिवस आम्हाला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि वाईट इच्छा यांचे विष काढून टाकण्यासाठी प्रेरणा देईल, सोबतच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांनाही बळकट करेल."
Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence. In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
14 ऑगस्ट : देशाचे दोन तुकडे
14 ऑगस्टची तारीख देशाच्या इतिहासात अश्रूंनी लिहिलेली आहे. हा तो दिवस होता जेव्हा देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले. या फाळणीत केवळ भारतीय उपखंडाचेच दोन भाग झाले नाहीत, तर बंगालचेही विभाजन झाले आणि बंगालचा पूर्व भाग भारतापासून विभक्त होऊन पूर्व पाकिस्तान बनला, जो 1971 च्या युद्धानंतर बांगलादेश झाला.
म्हणायला ही फक्त देशाची फाळणी आहे, पण प्रत्यक्षात ते अंतःकरण, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. देशावर ही फाळणीची जखम शतकानुशतके राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना या सर्वात वेदनादायक आणि रक्तरंजित दिवसाची छटा जाणवत राहतील.
Union Home Minister @AmitShah welcomes Prime Minister Shri Narendra Modi’s decision to observe 14 August as 'Partition Horrors Remembrance Day'
— PIB India (@PIB_India) August 14, 2021
Read here: https://t.co/n4UKEtXKgN