(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Kisan Samman Nidhi: 30 जून रोजी नाही तर 'या' दिवशी जमा होणार पीएम किसानचा 14 वा हप्ता
PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये देण्यात येतात. हे 6000 रुपये तीन हप्त्यात जमा करण्यात येतात.
नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा 14 हप्ता हा 30 जून रोजी लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार अशी माहिती होती. पण आत हा हप्ता 30 जून नव्हे तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केले नव्हते. त्यामुळे या 14 व्या हप्त्यासाठी वेळ लागला.
पीएम किसान योजनेचा या आधीचा म्हणजे 13 वा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 रोजी जमा झाला होता. त्यामुळे या जून महिन्यात 14 हप्ता जमा होणार असल्याचं सांगितलं जात होते. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती.
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये देण्यात येतात. हे 6000 रुपये तीन हप्त्यात जमा करण्यात येतात.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत त्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना हा हप्ता मिळू शकेल. केंद्र सरकारने या आधी ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 23 जूनची वेळ दिली होती.
तुमच्या आधार कार्ड अपडेटमध्ये काही चूक झाली तरी तुमचा 14 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. जर तुमचे ई-केवायसी झाले नसेल तर ते पूर्ण करावं लागणार आहे. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात काही अडचणींमुळे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे वेळेवर येत नाहीत, अशा लोकांनीही त्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्या लागणार आहेत.
पती-पत्नी दोघांच्याही खात्यात पैसे येतील का?
पती-पत्नी दोघेही शेती करत असतील तर पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता त्यांच्या खात्यात येईल का, हा अनेकांचा प्रश्न आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. दुसरीकडे फसवणूक करून किसान सन्मान निधीचे पैसे लाटणाऱ्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन ई-केवायसी कसे अपडेट करणार?
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.
ही बातमी वाचा: