एक्स्प्लोर
आरबीआयचा पेटीएमला पेमेंट बँकेसाठी हिरवा कंदील
नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पेटीएममध्ये आता पेमेंट बँकसुद्ध सुरु होणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासाठी पेटीएमला अधिकृत मंजूरी दिली असून, लवकरच पेमेट बँक तुमच्या पेटीएम अकाऊंटमध्ये सुरु होणार आहे. यासाठी पेटीएमच्या पेमेंट बँकेतील ग्राहकांचे खाते त्याच्या पेटीएम वॉलेटशी जोडण्यात येणार आहे, त्यातून 14.5 टक्क्याचे व्याज ग्राहकांना मिळणार आहे.
वास्तविक, पेटीएमने गेल्याच वर्षी पेमेंट बँक सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र इतर कंपन्यांच्या सहकार्य करारामध्ये पेटीएमची ही सेवा सुरु होण्यास उशीर झाला. कॅशलेस व्यवहारासाठी आरबीआयकडून नुकतेच पेमेंट बँकेला मंजूरी दिल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.
वन-97 कम्यूनिकेशनचे संस्थापक शेखर शर्मा यांनी ट्विटरच्यामाध्यमातून माहिती दिली आहे. पेटीएम पेमेंट बँकेत विजय शेखर यांची 51 टक्के भागिदारी असून, भारतीय नागरिकांना बँकांच्या सवलती देणे, तसेच तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून बँकिंग जगतात स्वत:चा ठसा उमटवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेला आरबीआयकडून मंजूरी मिळाल्यानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून सुरु होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या खात्यावर सर्वसामान्य नागरिक तसेच छोटो व्यापारी 1 लाखापर्यंतची रक्कम जमा करु शकतील असेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याची पहिली शाखा उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये सुरु होणार असल्याचे संकेत कंपनीच्या प्रवक्त्याने दिले आहेत. कंपनीला गेल्या वर्षीच्या दिवाळीतच ही सेवा सुरु करायची होती. यासाठी 2015 मध्ये रिझर्व बँकेने वन 97 कम्यूनिकेशनचे संस्थापक विजय शर्मा यांना सैद्धांतिक मंजूरी दिली होती. यानंतर त्यांना इतर 10 कंपन्यांसोबत पेमेंट बँकेची स्थापना करण्याची मंजूरी दिली. यानंतर टेक महिंद्रा, चोलामंडलम् इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स आणि दिलीप सांघवी, आयडीएफसी आणि टेलीनार फायनेन्शियल सर्व्हिसेसोबतच्या भागिदारीमुळे पेमेंट बँकिंगचे लायसन्सिंगमध्ये पिछेहाट झाली. दरम्यान, सध्या देशात केवळ एअरटेलचीच पेमेंट बँक कार्यरत असून आदित्य बिर्ला पेमेंट बँकेची सुरुवात 2017 च्या पहिल्या सहा महिन्यात सुरु करण्याची अपेक्षा आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेत विजय शर्मा यांची सर्वाधिक भागिदारी असल्याने, वन 97 कन्यूनिकेशन्सजवळ याचे सर्व अधिकार असणार आहेत.Hello World. #PaytmPaymentsBank https://t.co/IV3BEZh94G
— Vijay Shekhar (@vijayshekhar) January 3, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement