एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अंतरिम बजेट सादर होणार
निवडणुकीआधी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवर सरकार या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधित करतील. 13 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु राहणार आहे.
निवडणुकीआधी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवर सरकार या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मोदी सरकार 1 फेब्रुवारीला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीनंतर मे महिन्यात सत्तेत येणारं सरकार जुलैमध्ये संपूर्ण बजेट सादर करणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडलं जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरु होऊन 13 फेब्रुवारीला संपणार आहे. एप्रिल, मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर मे अखेरपर्यंत नव्या सरकारची स्थापना होईल. मात्र अंतरिम अर्थसंकल्पातही पुढील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाईल.
जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार
सध्या अर्थ मंत्रालयाचं कामकाज पाहणारे पियुष गोयल उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अरुण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेल्याने मागील आठवड्यातच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याआधी अरुण जेटली यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement