एक्स्प्लोर
पम्पोरमध्ये 57 तासांनंतर ऑपरेशन संपलं, 2 दहशतवाद्यांचा खात्मा
पंपोर (जम्मू-काश्मीर) : श्रीनगरजवळील पम्पोरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन 57 तासांनंतर संपलं आहे. भारतीय सैन्याने ईडीआय बिल्डिंगमध्ये घुसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
दोन दिवसांआधी पम्पोरमधील ईडीआय बिल्डिंगमध्ये दहशतवादी घुसले होते. सोमवारी सकाळी सहा वाजता ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं. भारतीय सैन्यातील जवानांनी ईडीआय बिल्डिंगच्या आत जाऊन ऑपरेशन यशस्वी केलं. सलग दोन दिवस दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता.
भारतीय सैन्याच्या वतीने मेजर जनरल अशोक नरुला यांनी सांगितले की, "ईडीआय बिल्डिंगमध्ये एकूण 60 खोल्या आहेत. त्यामुळे ऑपरेशनला अधिक वेळ गेला. भारतीय सैन्याने खात्मा केलेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेतील होते."
दहशतवाद्यांविरोधातील चकमकीमुळे सात मजल्यांची ईडीआय बिल्डिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याच्या स्थितीत आहे. ईडीआयच्या हॉस्टेल बिल्डिंगमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने रॉकेट लॉन्चर आणि ग्रेनेडचा हल्ला चढवला. ईडीआय बिल्डिंगच्या मागील नदीच्या मार्गे दहशतवादी घुसल्याचे म्हटले जात आहे.
ईडीआय बिल्डिंगमध्ये घुसल्यानंतर हॉस्टेलच्या एका खोलीमध्ये दहशतवाद्यांनी आग लावली. त्यानंतर भारतीय सैन्याने बिल्डिंगला सर्व बाजूने घेरण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी बिल्डिंगमधून फायरिंग सुरु केली. मंगळवारी अंधार पडल्यानंतर भारतीय सैन्याला ऑपरेशन काही काळ थांबवावं लागलं होतं.
या सर्व चकमकीच्या पहिल्याच दिवशी भारतीय सैन्यातील एक जवान आमि एक पोलिस जखमी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील एका मोठ्या हल्ल्यासाठी भारतात घुसले होते.
दहशतवादी ईडीआय बिल्डिंगच्या हॉस्टेलमध्ये घुसले तेव्हा सुदैवाने तिथे एकही विद्यार्थी नव्हते. त्यानंतर भारतीय सैन्याने अत्यंत नियोजनपूर्वक हे पूर्ण ऑपरेशन यशस्वी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement