एक्स्प्लोर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
युद्ध केल्यास कोणाचंच भलं होणार नाही, जर तुम्हाला दहशतवादावर चर्चा अपेक्षित असेल, तर आम्ही तयार आहोत. समजूतदारपणे मार्ग काढायला हवा. भारतीय सैन्याने आज सकाळी जम्मू काश्मिरच्या नौशेरातील लाम व्हॅलीमध्ये एक पाकिस्तानी विमान पाडलं, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.
मुंबई : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अरेरावीची भाषा करणारा पाकिस्तान नरमला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर सपशेल लोटांगण घातलं आहे. भेदरलेल्या इम्रान खान यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
युद्ध केल्यास कोणाचंच भलं होणार नाही, जर तुम्हाला दहशतवादावर चर्चा अपेक्षित असेल, तर आम्ही तयार आहोत. समजूतदारपणे मार्ग काढायला हवा. भारतीय सैन्याने आज सकाळी जम्मू काश्मिरच्या नौशेरातील लाम व्हॅलीमध्ये एक पाकिस्तानी विमान पाडलं, असंही इम्रान खान म्हणाले.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मू काश्मिरच्या भागात घुसखोरी करुन बॉम्ब हल्ले केले. मात्र या हल्ल्यात काहीही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेने नौशेराच्या लाम वॅलीमध्ये पाडलं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याआधी दिली होती.
भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईर भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
भारतीय वायुसेनेचा वैमानिक आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानच्या या दाव्याची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचंही म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement