एक्स्प्लोर
‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका
राहुल गांधी यांनी आज दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवरुन काँग्रेसवर जोरदार टीका सुरु केली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आज दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवरुन काँग्रेसवर जोरदार टीका सुरु केली आहे. घराणेशाही हीच परंपरा काँग्रेसची असल्यानं त्यांनी या प्रक्रियेला निवडीचं नाव देऊ नये. अशी टीका भाजपकडून दिला गेला.
आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काँग्रेसमधून एकानंही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही, तर राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष होतील आणि जर दुसरा अर्ज आलाच तर त्याचा अंतिम निर्णय १९ डिसेंबरला होणार आहे. मात्र, राहुल यांची निवड बिनविरोधच होण्याची अधिक चिन्हं आहेत.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला त्यावेळी काँग्रेस मुख्यालयात त्यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी राहुल यांचा एकमेव अर्ज आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ९०० सदस्यांनी राहुल यांचे जवळपास ९० अर्ज दाखल केले आहेत. राहुल हे १८वे तर गांधी घराण्यातील सहावे काँग्रेस अध्यक्ष असतील.
दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष असतील. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती असतील. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत
संबंधित बातम्या :
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement