एक्स्प्लोर
एक ट्वीट, 15 रुपये आणि टीटीने गमावली नोकरी
![एक ट्वीट, 15 रुपये आणि टीटीने गमावली नोकरी One Twit On Rail Minister Suresh Prabhu Take Action Immediately एक ट्वीट, 15 रुपये आणि टीटीने गमावली नोकरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/14125400/Suresh-Prabhu-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटर अकाऊंटमुळे रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस सुखकर होत आहे. रेल्वे प्रवाशांकडून त्यांना एखादे जरी ट्वीट मिळाले, तर त्यावर तत्काळ कार्यवाही होते. रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या कारवाईचा आणखीन एक प्रत्यय नुकताच आला.
रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. यानंतर पुढच्या दोनच तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर)वर निलंबनाची कारवाईही करण्यात आली.
बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी प्रवास करत होते. सामान्य तिकीट काढून प्रवास कारताना टीटीआयकडे 15 रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे 15 रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची पावती गोविंद नारायण यांना दिली नाही.
त्यामुळे त्यांनी थेट रेल्वे मंत्र्यांसोबत रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना ट्वीट करून यासंबंधी तक्रार केली. यानंतर लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रवासादरम्यान फोनवरून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले.
तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर सर्व प्रकार समजला. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम जमा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)