एक्स्प्लोर

जिल्हा न्यायाधीशांसाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत : सरन्यायाधीश चंद्रचूड

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी म्हटलं आहे की, जिल्हा न्यायाधीशांसाठी चांगले उमेदवार मिळत नाही आहेत. सर्व मुख्य न्यायाधीशांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Not Getting Good Candidates for District Judges : राजस्थानमधील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ( ADJ - Additional District Judge ) भरतीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिसूचनेत 250 उमेदवारांची निवड करत त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात फक्त चार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. या निकालाविरोधात प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली. यावर उत्तर देत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी म्हटलं आहे की, जिल्हा न्यायाधीशांसाठी चांगले उमेदवार मिळत नाही आहेत. राजस्थानमधील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ( ADJ - Additional District Judge ) भरतीसाठी मुख्य परीक्षेत बसलेल्या वकिलांकडून परीक्षेच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.

ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी उमेदवारांची बाजू मांडताना सांगितलं आहे की, ADJ पदासाठी 85 रिक्त जागा असूनही केवळ चार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. कागदपत्रांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन, बोनस गुण आणि नमूद मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्याची मागणी केली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पदांच्या संख्येपेक्षा 2-3 पट अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले पाहिजे. 

सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली आणि जे बी परदीयावाला यांच्या खंडपीठाने सांगितले आहे की, त्यांना ADJ पदांसाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत. सर्व मुख्य न्यायाधीशांचं ( CJ - Chief Justice ) हे म्हणणं आहे. दरम्यान, खंडपीठाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्ते संबंधित उच्च न्यायालयात जाऊ शकतात. न्यायालयाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यास, मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली जाते की, याचिका ती खंडपीठाकडे पाठवावी जेणेकरून भरती प्रक्रिया अंतिम केली जाऊ शकेल.

सरन्यायाधीशांनी काय म्हटलं?

cji चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला संपूर्ण देशभरात लॅटरल एंट्रीसाठी उमेदवार मिळत नाहीत. फक्त राजस्थानचं नाही तर संपूर्ण देशात हेच आहे. सर्व सरन्यायाधीश हेच सांगत आहेत. प्रशांत भूषण यांनी सांगितलं की, भरतीच्या माहितीपत्रकात 250 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल असं सांगण्यात आलं होतं, त्याऐवजी फक्त चार उमेदवारांना बोलावण्यात आलं. गुण देताना काही त्रुटी राहिली असेल असं सांगत, पुनर्मूल्यांकन केले जाऊ शकते अशी विनंती त्यांनी केली आहे. 

राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश भरतीबाबतच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, असंही किशोर यांनी खंडपीठाला सांगितलं. खंडपीठाने भूषण यांची बाजू ऐकून आदेश नोंदवला आहे की, भूषण यांनी उत्तरपत्रिकांचे न्यायाधीशांद्वारे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती केली आहे. यावरील निकालासाठी ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget