एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कैलास सत्यार्थींचा चोरीला गेलेला नोबेल सापडला, चोरांना बेड्या
नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांचा चोरीला गेलेला नोबेल पुरस्कार अखेर सापडला आहे. मुख्य आरोपीसह इतरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सत्यार्थी यांच्या घरातून चोरीला गेलेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि इतर सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये 7 फेब्रुवारीच्या रात्री ही चोरी झाली. चोरटे घराचं कुलूप तोडून आत घुसले आणि नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसह पारंपरिक दागिने आणि रोकडही लंपास केली.
कैलास सत्यार्थी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेले होते. घरात कुणीही नसल्याचं हेरत चोरट्यांनी डाव साधला. त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 56 आणि 99 मध्ये त्याच रात्री चोरी झाली होती.
कैलास सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरला!
लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सत्यार्थी दाम्पत्याला चोरीविषयी माहिती मिळाली. चोरीला गेलेला नोबेल पुरस्कार आणि आईने पत्नीला दिलेले दागिने, या दोन्ही गोष्टी अत्यंत मौल्यवान असल्याने अत्यंत वेदना होत असल्याच्या भावना सत्यार्थींनी व्यक्त केल्या होत्या. बालहक्क संरक्षण कार्यकर्ते असलेले कैलाश सत्यर्थी यांना 2014 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ‘बचपन बचाओ आंदोलन’ या संस्थेचे ते संस्थापक आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement