एक्स्प्लोर
Advertisement
'नीट'साठीची 25 वर्षाची वयोमर्यादा सुप्रीम कोर्टानं हटवली!
नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट' (NEET) परीक्षेसाठी असणारी वयाची मर्यादा आता हटवण्यात आली आहे. आतापर्यंत 25 वर्ष ही वयोमर्यादा 'नीट'साठी होती. मात्र, याप्रकरणी सुरु असलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला. 25 वर्षाच्या मर्यादेमुळे ज्या परीक्षार्थींना नीटचे फॉर्म भरता आले नव्हते. त्यांना आता 5 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 1 एप्रिल हीच मुदत असणार आहे.
सीबीएससीनं नीट परीक्षेसाठी 25 वर्षाची मर्यादा घातली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याचप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. तेव्हा सुप्रीम कोर्टानं वयोमर्यादा हटवण्याचा निकाल दिला. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
बऱ्याचदा अनेक विद्यार्थी पदवीनंतर नीट देण्यासाठी तयारी करतात. त्यामुळे 25 वर्ष ही वयोमर्यादा हटविण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. दरम्यान, मेडिकल कांउसिल ऑफ इंडियानं देखील म्हटलं होतं की, 'या वयोमर्यादेमुळे देशात डॉक्टरांची कमतरता आहे.'
'नीट परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून पुन्हा मोठ्या प्रमाणात परीक्षेची तयारी करावी लागेल.' असा युक्तीवाद सीबीएससीच्या वकिलांनी कोर्टात केला.
सुप्रीम कोर्टानं हा निकाल देताना स्पष्ट केलं की, 'जर याआधी इतर कोणत्या कोर्टानं या वर्योमर्यादेविषयी निकाल दिला असल्यास तो निर्णय देखील रद्द होईल.' 'नीट'ची यंदाची परीक्षा 7 मे रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement