एक्स्प्लोर
एनडीएकडून व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी : सूत्र
एबीपी माझाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरु आहे, तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एबीपी माझाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱ्याला संधी देण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळेच व्यंकय्या नायडूंना उमेदवारी देण्यात आली. उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांचं नाव स्पर्धेत असल्याचं बोललं जात होतं. मात्र व्यंकय्या नायडूंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
व्यंकय्या नायडू यांचा अल्पपरिचय
व्यंकय्या नायडू हे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एक आहेत. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. तर तत्कालीन पतंप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं.
यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी
काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर उपराष्ट्रपतीपदासाठी अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement