एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सनी देओलला भेटल्यावर नरेंद्र मोदींना 'त्या' गाजलेल्या डायलॉगची आठवण झाली
पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलेल्या बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलेल्या बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सनी देओलला भेटल्यानंतर मोदींनी त्याच्यासोबत एक फोटो काढून ट्विटरवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मोदींनी म्हटले आहे की, 'हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!'
नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, "आज यांना (सनी देओल) भेटून मला खूप आनंद झाला आहे. गुरुदासपूरमध्ये यांना विजय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. भारत समृद्ध होईल, यावर आम्हा दोघांचे एकमत झाले आहे." त्यासोबतच मोदींनी लिहिलं आहे, "हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा."
सनी देओलने 22 एप्रिल रोजी भाजपात प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सनीला भाजपने गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून सनीचा मुकाबला काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांच्यासोबत होणार आहे.
सनी देओलचा चित्रपट 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटात सनीच्या तोंडी एक डायलॉग आहे. ज्यामध्ये सनी देओल पाकिस्तानमध्ये जाऊन त्याच्या सासऱ्याला (अमरिश पुरी) म्हणतो, "हमारा हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा." सनीचा हा डायलॉग आजही प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आहे. त्यामुळे आज सनीला भेटल्यावर पंतप्रधान मोदींनीही या डायलॉगची आठवण करुन दिली.
What struck me about @iamsunnydeol is his humility and deep passion for a better India.
Happy to have met him today. We are all rooting for his victory in Gurdaspur! We both agree- हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा! pic.twitter.com/o4tcvITy2e — Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
निवडणूक
क्रिकेट
Advertisement