एक्स्प्लोर
वृक्षलागवडीसाठी मुनगंटीवारांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
![वृक्षलागवडीसाठी मुनगंटीवारांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण Mungantiwar Meet Pm Modi वृक्षलागवडीसाठी मुनगंटीवारांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण](https://static.abplive.com/abp_images/203370/thumbmail/20%20mungantiwar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : येत्या एक जुलै रोजी महाराष्ट्रात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेऊन त्यांना वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येकी एक झाडाचे रोप भेट देण्याची सूचना केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. परिणामी पावासाचं प्रमाणही घटलं आहे. त्यामुळे सरकारनं मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यात आलं आहे.
दिल्ली दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रपुरात लवकरच दुसरं सैनिक स्कूल सुरु होणार आहे. तर मराठवाड्यात लष्कराची इको बटालियन सुरु होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)