एक्स्प्लोर

Seema Haider : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी, 'सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर...' 

Mumbai Terrorist Attack Treat Call : सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचली. तिने हिंदू धर्म स्वीकारत सचिन या तरुणाशी लग्न केलं आहे.

Seema Haider Pakistan Threat Call : पाकिस्तान (Pakistan) सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशी धमकी मुंबई पोलिसांना आली आहे. धमकी देण्याऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला संपर्क करून धमकी दिली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला 13 जुलै रोजी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे की, पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा अन्यथा 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार राहा. 

मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी

पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतात अवैधरित्या दाखल झाल्याने आधीच वातावरण तापलं असताना आता या धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली आहे.  मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच मिळून या धमकी प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला असे अनेक फोन येतात, त्यामुळे हा फोन कॉल खरा आहे की बोगस याचा शोध आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच घेत आहेत.

'सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर...'

या धमकीच्या फोनमुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.  मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, कॉलरने 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली आणि उत्तर प्रदेश सरकारला दोष दिला आहे.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहेत. पाकिस्तानी सीमा हैदर भारतातील सचिनच्या प्रेमासाठी सीमापार करुन भारतात आली. सीमाने अवैधरित्या भारतात घुसखोरी केली. तिच्याकडे आवश्यक कागदपत्रं नव्हती. यामुळे सीमावर्ती भागातील अवैध घुसखोरी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सीमा हैदरबाबत संश असून त्यामुळे या प्रकरणात गुप्तहेरी संदर्भातील अँगलही तपासण्याचं काम सुरु आहे.

सीमा आणि सचिनची 'लव्ह स्टोरी'

सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचली. तिने हिंदू धर्म स्वीकारत सचिन मीना या तरुणाशी लग्न केलं आहे. हे दोघं सांगतात की, ऑनलाईन गेम खेळताना यांची ओळख झाली. पबजी गेम खेळताना मैत्री आणि त्याचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. त्यानंतर सीमाने सचिनला भेटण्याच ठरवलं आणि त्यासाठी ती थेट भारतात पोहोचली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Seema Haider : पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर पाक सैन्य दलातील अधिकारी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget