Seema Haider : पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर पाक सैन्य दलातील अधिकारी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Seema Haider Fact Check : सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याशिवाय सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचंही बोललं जात आहे.
Seema Haider News : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फार चर्चेत आहे. दोघांची पबजी गेमवर ओळख झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा घरदार सोडून भारतात आली. सीमा हैदर संदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याशिवाय सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचंही बोललं जात आहे. या दाव्यामागचं नेमकं तथ्य काय आहे, जाणून घ्या.
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर सैन्य दलातील अधिकारी?
सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा हैदर तिच्या नवऱ्याला सोडून चार मुलासह भारतात आली. सीमा नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारून सचिनसोबत लग्न केलं, असा सीमा आणि सचिनचा दावा आहे. दरम्यान, पाकिस्तानी सीमा बेकायदेशीर पद्धतीना भारतात आल्यामुळे यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा किंवा दहशतवादाचा अँगल असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. याशिवाय, सीमा हैदरची नेमकी ओळख काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सीमा हैदर काही वाईट हेतूने भारतात आल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. इतकंच नाही तर काहींनी सीमाला पाकिस्तानी गुप्तहेरही म्हटलं आहे. त्याशिवाय, सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचंही म्हटलं जात आहे. पण, हे दावे फक्त सोशल मीडियावर करण्यात येत असून यामागचं सत्य वेगळं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमा हैदरचा चेहरा मेजर सामियासारखा दिसतो, त्यामुळे दोघांचेही फोटो व्हायरल झाले होते.
नेमकं सत्य काय?
दरम्यान, सीमा हैदर आणि मेजर सामिया रहमान यांचा फोटो पाहिल्यास दोघांच्याही चेहऱ्यात खूप फरक आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, सीमा हैदर ही पाकिस्तानी मेजर सामिया रहमान असल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहे मेजर सामिया रहमान?
मीडिया रिपोर्टनुसार, सामिया रहमान पाकिस्तानी लष्करात मेजर म्हणून कार्यरत आहेत. ISPR द्वारे 2022 मध्ये निर्मित टीव्ही मालिका 'सिनफ ए आहान' मध्ये सामियाने 'मेजर सामिया'ची भूमिका साकारली होती. मेजर सामिया रेहमान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेतही काम केलं आहे. तर, गल्फ न्यूजच्या 2020 च्या अहवालानुसार, मेजर सामियाला दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.
संबंधित इतर बातम्या :