एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MP Political Crisis | शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-भाजपची आमदार वाचवा मोहीम
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र कमलनाथ देखील भाजपचे आमदार फोडू शकतात या भीतीपोटी मध्य प्रदेशातल्या भाजपच्या आमदारांना गुरुग्रामच्या ITC ग्रॅण्ड भारत हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
भोपाळ : एकीकडे देशात होळीचा उत्साह असताना मध्य प्रदेशात राजकीय धुळवड सुरु होती. शिंदे कुटुंबाचे उत्तराधिकारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यासोबतच पक्षाच्या 22 आमदारांनीही आपलं पद सोडलं. यानंतर मध्य प्रदेश सरकार आता अल्पमतात आल्याचं चित्र आहे. त्यातच ज्योतिरादित्य शिंदे आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दिल्लीपासून भोपाळपर्यंत बैठकांचं सत्र सुरु आहे. कमलनाथ यांना आपलं सरकार वाचवण्यात यश येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजप आमदारांचा गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये मुक्काम
फुटीच्या भीतीने भाजपने आपल्या 106 आमदारांना भोपाळवरुन विमानाने दिल्लीला पाठवलं. या आमदारांना भेटण्यासाठी शिवराज सिंह चौहान दिल्ली विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर आमदारांना बसमधून गुरुग्रामला पाठवण्यात आलं. गुरुग्रामच्या आयटीसी ग्रॅण्ड भारत हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवण्यात आलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार धोक्यात, ज्योतिरादित्य शिंदेंसह काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा
ज्योतिरादित्य शिंदेंचा आज भाजप प्रवेश?
एकेकाळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुलिवंदनाच्या दिवशीच पक्षाचा राजीनामा देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्यात माहील एक वर्षातील परिस्थितीचा उल्लेख केला आणि तेच राजीनाम्याचं कारण असल्याचं सांगितलं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी (10 मार्च) अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ज्योतिरादित्य शिंदे मंगळवारी संध्याकाळीच भाजपमध्ये प्रवेश करणार असं म्हटलं जात होतं. परंतु त्यांचा भाजप प्रवेश बुधवारपर्यंत (11 मार्च) टळला .
दरम्यान भाजप ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राज्यसभेवर पाठवणार असून त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जागाही मिळणार असल्याची चर्चा आहे.
कमलनाथ सरकार धोक्यात
22 आमदारांच्या राजीनाम्यासोबतच कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे. आम्हाला अजूनही बहुमत आहे, असा दावा कमलनाथ करत आहेत. यातच काँग्रेसने उर्वरित आमदारांना जयपूरमध्ये ठेवलं आहे. आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेत बहुमताचा आकडाही कमी होऊन 104 वर पोहोचला आहे. 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा आकडा 114 वरुन 92 वर पोहोचला आहे. मात्र मंगळवारी संध्याकाळी कमलनाथ यांनी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेस 92 ऐवजी 88 आमदारच पोहोचले. परंतु आतापर्यंत सपा-बसपा आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेसकडे 99 आमदारांचा पाठिंबा आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा
मध्य प्रदेश विधानसभेचं गणित!
मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत, त्यापैकी दोन जागा रिकाम्या आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. जर या आमदारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तर विधानसभेची एकूण संख्या 206 झाली आहे. परिणामी बहुमतासाठी 104 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसच्या 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर सध्याच्या घडीला पक्षाच्या आमदारांची संख्या 92 आहे. तर भाजपकडे 107 आमदार आहे. तर त्यांना इतर सात पक्षाच्या आमदारांचंही समर्थन आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर कमलनाथ यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.
आता विधानसभेत एकूण संख्या : 206
बहुमतचा आकडा : 104
काँग्रेस आघाडीचा आकडा : 99
भाजपचा आकडा : 107
किती आमदारांचा राजीनामा : 22
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement