एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट टीव्ही हॅक करु पती-पत्नीचा व्हिडीओ, खासदार अमर साबळेंकडून कारवाईची मागणी
हॅकर्स आता लोकांच्या बेडरुममध्ये पोहोचले आहेत. गुजरातच्या सूरतमध्ये दोन प्रकरणं समोर आली आहे. हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला आणि इंटरनेटवर अपलोड केला.
नवी दिल्ली : देशात सायबर क्राईमचं नवं प्रकरण समोर आलं आहे. गुजरातच्या सूरतमध्ये हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ बनवला आणि तो इंटरनेटवर अपलोड केला. महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. अशा हॅकर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर साबळे यांनी केली.
अमर साबळे काय म्हणाले?
"जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमध्ये दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. स्मार्ट टीव्ही बेडरुममध्ये असणं धोकादायक आहे. सूरतमध्ये त्याच्या दुरुपयोगाची दोन नवी प्रकरणं समोर आली आहेत. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये घुसले आहेत. त्यांनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला आणि इंटरनेटवर अपलोड केला. ही अतिशय चुकीची बाब आहे," असं खासदार साबळे राज्यसभेत म्हणाले. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी साबळेंनी राज्य सरकारकडे केली आहे. तर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही या प्रश्नावर आक्षेप नोंदवला.
प्रकरण समोर कसं आलं? आपला व्हिडीओ इंटरनेटवर पाहिल्यावर पती-पत्नी या प्रकरणाची माहिती मिळाली. अशी प्रकरणं समोर येत आहेत, ज्यावरुन समजतं की कोणीही सुरक्षित नाही. हा देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे.While giving Zero Hour Notice in Rajya Sabha on need for cyber security in the country.#BJP #bjp4all #RajyaSabha #cyberSecurity #amarSable pic.twitter.com/uT542AIt4m
— Amar Sable (@sable_amar) July 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement