एक्स्प्लोर

Horoscope Today 12 June 2023 : मेष, कन्या, मकर राशीसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 12 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 June 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीतही बदल होताना दिसतील. तर, कुंभ राशीचे सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल.व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना सुरू करतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांद्वारे उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यक्रमातही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करू शकता. तुमच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मदत मिळेल. नोकरदार लोक नोकरीबरोबरच काही व्यवसाय करण्याचाही विचार करतील, जेणेकरून उत्पन्नात आणखी वाढ होईल. सामाजिक क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवाल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल.
आज जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. आज कामाच्या ठिकाणी जास्त ताण असेल. अशा वेळी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं तसेच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्ही योग, ध्यान करून दिवसाची सुरुवात करू शकता, हे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमच्यामध्ये दिवसभर सकारात्मक ऊर्जा असेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. केवळ कठोर परिश्रम करूनच तुम्हाला योग्य फळ मिळू शकेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. छोटे व्यावसायिकही आपला व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे, नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर कराल. आज तुमच्यावर कुटुंबातील सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळेल. आज तुम्हाला नवीन काही शिकण्याच्या आणखी संधी मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडीची कामे करा. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा खूप चांगला जाणार आहे. आज जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना देखील आखू शकता. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही नवीन उत्पन्नाच्या संधी मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. मुलांकडून आदर वाढेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. तुमच्या तब्येतीतही चढ-उतार असतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.  तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक रखडलेली व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. वडील तुमच्या व्यवसायात थोडे पैसे खर्च करतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही आज परत करा. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही पैसे गुंतवाल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसणार आहेत. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज कोणाच्याही सल्ल्यानुसार कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. नोकरीत बढतीची संधी निर्माण होईल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदाने भरलेलं असेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे तम्ही पूर्ण करू शकाल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता देखील निर्माण होईल, हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल, या निमित्ताने जुन्या आठवणी ताज्या होतील. उद्या तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सरकारी क्षेत्रांतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. आज तुम्हाला अचानक प्रवासाला जाण्याचा योग येईल, पण हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात स्वत:ळा गुंतवून घ्या. अन्यथा तुमच्या मनात असंख्य विचार सुरु असतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा दिसेल. आज तुमचा आत्मविश्वास तुमच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. मात्र, आज कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 June 2023 : मेष, मिथुन, तूळ सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशीसाठी ऑगस्टच्या तिसरा आठवडा गेमचेंजर, नवी जबाबदारी, पैसा येण्याचे संकेत; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशीसाठी ऑगस्टच्या तिसरा आठवडा गेमचेंजर, नवी जबाबदारी, पैसा येण्याचे संकेत; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget