एक्स्प्लोर

Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले

mahayuti government oath taking ceremony: महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार, याची चर्चा सध्या रंगील आहे.

मुंबई: गेल्या टर्ममध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे आता विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) अनेक बडे आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. अद्याप महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधीचा (Mahayuti Government Oath Taking Ceremony) मुहूर्त ठरलेला नाही. मात्र, त्याआधीच शिंदे गटाच्या बड्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकत मंत्रि‍पदासाठी लॉबिंग सुरु केले आहे. 

यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा मंत्रिपद  मिळावे  यासाठी माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ज्यांच्याकडे मंत्रिपदे होती, ते आमदार आपापली खाती पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप हा महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रीपदं येण्याची शक्यता असून शिवसनेच्या वाट्याला कमी मंत्रीपद येऊ शकतात, असा अंदाज आहे.

मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता शिंदे गटाचे बहुतांश आमदार पहिल्याच खेपेत मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी ताकद लावत आहेत. कारण गेल्या टर्ममध्ये शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी हमखास संधी मिळेल, अशी चर्चा असणाऱ्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना शेवटपर्यंत वंचित राहावे लागले होते. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, या आशेने या दोन्ही आमदारांनी शेवटपर्यंत मंत्रि‍पदाची वाट पाहिले होती. मात्र, या दोघांना मंत्रीपद मिळाल नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते विरोधकांच्या खिल्लीचा विषय ठरले होते. अखेर विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी तर भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांची बोळवण करण्यात आली होती. 

भरत गोगावलेंना आतातरी कोट घालायला मिळणार का?

महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळात महाडचे आमदार भरत गोगावले यांना संधी मिळेल, अशी खात्री अनेकांना होती. भरत गोगावले यांनीही शपथविधीसाठी खास कोट शिवून ठेवला होता, असे सांगितले जाते. मात्र, मंत्रीपद न मिळाल्यामुळे भरत गोगावले यांना या कोटाची घडी मोडण्याची संधी कधीच मिळालीच नव्हती. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये तरी भरत गोगावले यांना शपथविधीसाठी शिवून घेतलेल्या कोटाची घडी मोडण्याची संधी मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?

महत्त्वाच्या बातम्या

E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget