एक्स्प्लोर

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Mumbai Watersupply cut: गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ पासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती कारणाने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai Water cut: मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे.मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती कारणाने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती कारणाने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २२ तासांच्या दुरूस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन करण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचं काम

लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. आसपासच्या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

कोणत्या विभागांत पाणीपुरवठा बंद? 

जी दक्षिण विभाग : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ०४.३० ते सकाळी ०७.४५) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०२.३० ते दुपारी ०३.३०) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.
          
जी दक्षिण विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.००) पाणीपुरवठा अंशत: बंद राहील. (३३ टक्के)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
Embed widget