Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालानंतर भाजपने सी आणि बी कॅटेगिरीच्या बुथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपने जिंकलेल्या विधानसभेच्या 132 पैकी तब्बल 75 जागा फक्त बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर जिंकल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे जे बूथ "सी कॅटेगिरी" मध्ये घसरले होते त्यांना "बी कॅटेगरी"त तर "बी कॅटेगरी" मधील बूथ "ए कॅटेगरी"मध्ये नेण्याची (upgrade) किमया भाजप कार्यकर्त्यांनी केली आणि तब्बल 75 विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या बूथचे वर्गीकरण कसे असते -
A कॅटेगिरी - लोकसभा निवडणुकीत जिथे महायुतीला 50% पेक्षा जास्त मतदान मिळाले...
B कॅटेगिरी जिथे महायुतीला 35 ते 50% मतदान मिळाले..
C कॅटेगिरी जिथे महायुतीला 20 ते 35% मतदान मिळाले..
D कॅटेगिरी जिथे महायुतीला 20% पेक्षा कमी मतदान मिळाले..
बूथच्या यादीचे वाचन बंधनकारक-
लोकसभेच्या निकालानंतर भाजपने सी आणि बी कॅटेगिरीच्या बुथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. नवीन मतदार नोंदणी करून, लोकसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना भाजप किंवा महायुतीसाठी मतदान करण्यास प्रोत्साहित करून सी कॅटेगिरी चे दहा टक्के बूथ बी कॅटेगिरी मध्ये नेले. तर बी कॅटेगिरी चे सुमारे 20% बूथ ए कॅटेगरीत परावर्तित केले. प्रत्येक बूथ वरील कार्यकर्त्यांना त्यांच्या बूथच्या यादीचे वाचन बंधनकारक केले.
यादी वचन करून कोणता मतदार कुठे राहतो, तो भाजपला मतदान करू शकतो की नाही, त्याच्याशी भेटून-बोलून त्याचे मत परावर्तित करता येऊ शकते की नाही याचा आढावा प्रत्येक बूथ वर घेण्यात आला. लोकसभेत महायुतीला मतदान न करणाऱ्या मात्र भेटल्याने यंदा मत परावर्तित करू शकणाऱ्या प्रत्येक मतदाराला भाजप कार्यकर्ते अनेक वेळेला भेटले, बोलले..आणि "सी कॅटेगरी" मधील बुध "बी कॅटेगरी" मध्ये आणि "बी कॅटेगरी" चे बूथ "ए कॅटेगरी"त परावर्तित करण्यात यश आल्याचे भाजपचे आकलन आहे.
लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप लाभार्थ्यांचे मोठमोठे संमेलन-
एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपने विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींसंदर्भात आपली योजना बदलवली. लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप लाभार्थ्यांचे मोठमोठे संमेलन घेत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थींचे मोठ-मोठे संमेलन घेण्याऐवजी त्यांच्या परिसरात जाऊन 50 - 100 लाभार्थींना एकत्रित करून छोट्या बैठका घेण्यात आल्या.. त्यांच्याशी वन टू वन संवाद करण्यात आले आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेणारे मात्र लोकसभेत भाजपला मतदान न करणारे अनेक लाभार्थी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने आहे.
संबंधित बातमी:
Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?