(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणी
Rahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणी
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. नागरिकांना पॅन आणि टॅन यांचा वापर अधिक सोपा आणि कार्यक्षम बनवून ते जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
सध्या अस्तित्वात असलेला पॅन डेटाबेस 78 कोटी पॅन आणि 73.28 लाख टॅनचा असून विविध प्रकारचे मंच/ पोर्टल्स एकीकरण करण्यावर आणि पॅन/ टॅन धारकांना कार्यक्षम सेवा देण्यावर भर देत करदात्यांच्या गरजांची पूर्तता करणारा पॅन 2.0 प्रकल्प आहे. सध्या पॅन-संबंधित सेवा, ई-फायलिंग पोर्टल, यूटीआयआयटीएसएल पोर्टल आणि प्रोटिअन ई-जीओव्ही पोर्टल या तीन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विस्तारलेल्या आहेत.
पॅन 2.0 च्या अंमलबजावणीमुळे या सर्व सेवा एका, एकीकृत पोर्टलमध्ये एकत्रित होणार आहे. पॅन 2.0 हा एक मंच आहे. पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन वैधताकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांची सर्वसमावेशकतेने हाताळणी करणार आहे. पॅन 2.0 प्रकल्पाद्वारे प्रक्रिया सोपे करण्याचा, विलंब टाळण्याचा आणि तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे.