Morning Headlines 27th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या लढ्याला यश! नवा अध्यादेश सुपूर्द, मराठा बांधवांकडून जल्लोष
Manoj Jarange, Maratha Reservation : नवी मुंबई : राज्य सरकारच्या (State Government) शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर
मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?
Declaration Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे... वाचा सविस्तर
Union Budget 2024 : मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा? नव्या अर्थसंकल्पात 4 कर सवलती मिळण्याची अपेक्षा
Union Budget 2024: नवी दिल्ली : अवघ्या काहीच दिवसांत मोदी सरकार (Modi Government) आपल्या दुसऱ्या कार्यकाळाती शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प (Budget 2024) असल्यामुळे या अर्थसंकल्पात मोदी सरकार देशवासियांसाठी अनेक मोठ्या घोषणा आणि योजनांचा पेटारा खोलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) मोदी सरकारचा 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. मात्र करमुक्तीबाबत लोकांच्या काही अपेक्षा आहेत, ज्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. वाचा सविस्तर
Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात वाढ? तुमच्या शहरातील आजचा भाव काय? पाहा
Gold Rate Today In India, 27 January 2024 : आज सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीच्या विचारात असाल, तर बाजारात जाण्याआधी सोने-चांदीचा लेटेस्ट भाव जाणून घ्या. आज सोने-चांदी महागली (Gold Silver Price Hike) आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव वाढला आहे. आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या... वाचा सविस्तर
IND vs ENG 1st Test: याची बॅट जणू तळपती तलवार, यानं टाकलेला बॉल तर तोफगोळाच; प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवतो टीम इंडियाचा 'सर' जाडेजा
IND vs ENG 1st Test: नवी दिल्ली : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test) हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजा (Team India All Rounder Ravindra Jadeja) इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. तर आपल्या गोलंदाजीनंही त्यानं इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. रवींद्र जाडेजानं पहिल्या डावात तीन विकेट चटकावल्या आणि आतापर्यंत 81 धावा केल्या आहेत. त्यामुळे आजचा खेळ सुरू झाल्यानंतर शतक झळकावण्याची संधी जाडेजाकडे असेल. वाचा सविस्तर
Horoscope Today 27 January 2024 : आजचा शनिवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 27 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 27 जानेवारी 2024 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांनी आज ठोस कागदपत्रांशिवाय पैसे देऊ नये, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आज कन्या राशीचा कुटुंबातील सदस्य त्याच्या समस्या तुमच्याशी शेअर करू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर