एक्स्प्लोर

Morning Headlines 26th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

India-France : फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी सुखरुप मायदेशी परतले; मानवी तस्करीच्या संशयावरून 4 दिवस अडकले होते प्रवासी

France Flight Grounded in India : मानवी तस्करीच्या (Human Trafficking) आरोपाखाली फ्रान्समध्ये (France) थांबवलेलं रोमानियन विमान प्रवाशांसह मुंबईत (Mumbai) दाखल झालं आहे. या विमानात 303 प्रवासी होते, त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात (India) परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून दोन प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, "परिस्थिती लवकरात लवकर सोडवल्याबद्दल फ्रेंच सरकार आणि वात्री विमानतळाचे आभार." वाचा सविस्तर 

अरबी समुद्रात व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला; इंडियन कोस्ट गार्डकडून एमव्ही केम प्लुटो एस्कॉर्ट, पाहा PHOTOS

Merchant Vessel MV Chem Pluto: भारतात (India) येत असताना अरबी समुद्रात (Arabian Sea) हल्ला झालेलं जहाज अखेर मुंबईच्या (Mumbai News) किनाऱ्यावर पोहोचलं. जहाज समुद्रात असतानाच या जहाजावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यानंतर या जहाजाला इंडियन कोस्ट गार्डच्या (Indian Coast Guard) जहाजामार्फत एस्कॉर्ट करण्यात आलं. इंडियन कोस्ट गार्डच्या सहाय्यानं अखेर जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात यश आलं आहे... वाचा सविस्तर 

Weather Update : 'या' भागात आज पुन्हा पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह उत्तर भारतात थंडीची लाट

Weather Update Today : देशात आता थंडीचा कडाका (Cold Weather) वाढताना दिसत आहे. आज मंगळवारपासून देशभरात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) महाराष्ट्रात (Maharashtra) गारठा (Cold Wave) वाढला आहे. तर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या महितीनुसार, 26 डिसेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे, राजस्थानमध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम  महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. वाचा सविस्तर 

India Vs South Africa 1st Test: ऑल द बेस्ट रोहित ब्रिगेड! 31 वर्षांपासून विजयाची आस; टीम इंडिया आफ्रिकेला चितपट करण्यासाठी तयार

Team India Vs South Africa 1st Test: टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. सेंच्युरियन इथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचं सावट आहे. तर त्यानंतरचे तीन दिवस हवामानात सुधारणा अपेक्षित आहे. वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका भारतानं आधीच जिंकली आहे. त्यानंतर आता  दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची 31 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. वाचा सविस्तर 

अमेरिकेनं परदेशी विद्यार्थ्यांसाठी नियम बदलले; भारतीय विद्यार्थ्यांवर कसा होणार परिणाम?

America Uscis Updates Policy Guidance: जगभरातून इतर देशांमध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. अशातच भारतातून (India) अमेरिकेत (America) जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून अमेरिकेनं व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे बदल F आणि M श्रेणीतील व्हिसाधारकांसाठी करण्यात आले आहेत. या अंतर्गत यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने अमेरिकन शैक्षणिक संस्थांमधील अभ्यास आणि रोजगार श्रेणीमध्ये स्थलांतरित व्हिसासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे... वाचा सविस्तर 

Health : IVF उपचारादरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढवायची आहे? मग 'हे' डाएट घ्या

Mediterranean Diet : गर्भधारणेसाठी (Pregnancy) अनेक महिला (Women) आयव्हीएफ उपचारांची (IVF Treatment) मदत घेतात. आयव्हीएफ (IVF) उपचार (Treatment) अधिक फलदायी ठरण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. आयव्हीएफ उपचारादरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) फायदेशीर ठरते. आयव्हीएफ उपचारादरम्यान मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते, असा दावा संशोधनाद्वारे करण्यात आला आहे... वाचा सविस्तर 

Datta Jayanti 2023 : आज दत्त जयंती; जाणून घ्या महत्त्व, मुहूर्त आणि पूजा विधी

Datta Jayanti 2023 : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा (Datta) जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. यंदा, आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती (Datta Jayanti 2023) आहे. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्याने, उपासना केल्याने दत्ततत्त्वाचा अधिक लाभ मिळतो, अशी मान्यता आहे. वाचा सविस्तर 

26 December In History : बाबा आमटे यांचा जन्म, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना; आज इतिहासात

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आजच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी बाबा आमटे यांचा जन्म झाला होता. तसेच त्यांचा मुलगा प्रकाश आमटे यांचा देखील आज जन्मदिवस आहे.  स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांचा देखील जन्म झाला होता. 25 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात... वाचा सविस्तर

Horoscope Today 26 December 2023 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या 

Horoscope Today 26 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 26 डिसेंबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार करिअर करण्याची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामात थोडी काळजी घेतल्यास तुम्हाला मोठे यश मिळू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Embed widget