Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Mumbai Rains : मुंबईतील समुद्राला आज आणि उद्या दोन दिवस भरती ओहोटी येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं ट्विट करुन दिली आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागानं (IMD) मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा (Mumbai Rains) अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. 25 जून म्हणजेच आज दुपारी समुद्राला भरती ओहोटी (Mumbai Sea High Tide Low Tide) येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. बुधवारी देखील भरती ओहोटी येणार आहे.
मुंबईत दरवर्षी जून महिन्यात होणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा 45-50 टक्के तूट आली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 26 जूननंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत 9 जूनला मान्सून दाखल झाला होता. लवकर मान्सून दाखल होऊन देखील नंतर मान्सूनच जोर ओसरला होता. हवामान विभागाच्यावतीनं जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला गेला होता. आतापर्यंत जून महिन्यातील पावसाच्या आकडेवारीत 45-50 टक्के तूट जाणवत आहे.
मुंबईत जून महिन्यात 550 मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सांताक्रुझ येथील पर्जन्यमापक केंद्रात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईत सर्वसाधारणपणे मान्सूनच्या चार महिन्यात 2300 मिमी पावसाची नोंद होते.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागातील अधिकारी सुनील कांबळे यांनी मुंबईत सध्या मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जूनच्या 26-27 तारखेनंतर पावसाचा वेग वाढेल असं ते म्हणाले. हवामान विभागानं यासंदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं पुढील 27 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला होता. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.
🗓️ २५ जून २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 25, 2024
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती- दुपारी - ०२:३६ वाजता - ४.५३ मीटर
ओहोटी - रात्री - ०८:४१ वाजता - १.६८ मीटर
🌊 भरती - (उद्या - दि.२६.०६.२०२४) - मध्यरात्री - ०२:२५ वाजता - ३.८४…
मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईत समुद्राला भरती ओहोटी कधी येणार?
भरती- दुपारी - 02 : 36 वाजता - 4.53 मीटर
ओहोटी - रात्री - 08:41 वाजता - 1.68 मीटर
भरती - 26 जून - मध्यरात्री - 2:25 वाजता - 3.84 मीटर
ओहोटी -26 जून - सकाळी 08:13 वाजता -0.77 मीटर
दरम्यान, राज्यात देखील मान्सूननं अपेक्षेप्रमाणं हजेरी लावलेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत मान्सून राज्यात यंदा लवकर दाखल झाला. मात्र, त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. राज्यभरातील शेतकरी राज्यात जोरदार पाऊस कधी दाखल होणार याकडे लावून बसलेला आहे.
संबंधित बातम्या :