Morning Headlines 22nd October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Cyclone Tej : तेज चक्रीवादळाचं संकट! पुढील 24 तासांत विक्राळ रुप धारण करणार; IMD कडून अलर्ट जारी
Cyclone Tej IMD Alert : अरबी समुद्र (Arabian Sea) मध्ये 'तेज' चक्रीवादळ (Tej Cyclone ) तयार झालं असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रूप धारण करू शकतं. पुढील 24 तासांत त्याचे आणखी खोल दाबात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाचं वर्णन अतिशय तीव्र चक्रीवादळ असं केलं आहे. वाचा सविस्तर...
Gaganyaan : गगनयान मोहिमेचं पहिलं पाऊल! उड्डाण चाचणी, यशस्वी चाचणीनंतर बंगालच्या खाडीतून क्रू मॉड्यूल सापडलं
इस्रोच्या महत्त्वाकांक्षी पहिल्या मानवी मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1 (TV-D1) चं प्रक्षेपण (ISRO Gaganyaan Crew Module Abort Test) 21 ऑक्टोबरला करण्यात आलं. इस्रो प्रमुखांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, गगनयानचं क्रू मॉड्युल बंगालच्या उपसागरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...
Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात किम जोंग उनची एन्ट्री, हमासकडून उत्तर कोरियाच्या हत्यारांचा वापर
स्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाच्या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलने जप्त केलेली शस्त्रे आणि हमासचे व्हिडीओ यावरुन स्पष्ट झालं आहे की, उत्तर कोरिया दहशतवादी संघटना हमासला शस्त्रे विकत आहे. वाचा सविस्तर...
Navratri 8th Day 2023 : नवरात्रीचा आठवा दिवस, देवीचे नाव महागौरी कसे पडले? शास्त्रात पूजेचे महत्त्व, देवीचे रुप जाणून घ्या
Navratri 8th Day 2023 : आज 22 ऑक्टोबर 2023, आज दुर्गाष्टमी आहे, देवी महागौरी (Devi Mahagauri) ही शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवसाची अधिष्ठात्री देवी आहे. 15 ऑक्टोबरपासून 9 दिवसांच्या नवरात्रीला सुरुवात झाली असून आज अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे. धार्मिक ग्रंथ आणि शास्त्र काय सांगतात? देवी महागौरीची कथा आणि पूजेचे महत्त्व जाणून घ्या. वाचा सविस्तर...
Horoscope Today 22 October 2023 : दुर्गाष्टमीच्या दिवशी 'या' राशींवर देवीची कृपा होणार, आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 22 October 2023 : ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे केले जाते. आज 22 ऑक्टोबर 2023 रविवार आहे. हा दिवस शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, नवरात्रीच्या आठव्या दिवशी काही राशीच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळतील तर काहींनी काळजी घेणे आवश्यक आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी कोणत्या राशींना फायदा होईल? कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल? मेष ते मीन राशीचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर...
22 October In History : भाक्रा धरण देशाला अर्पण, जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार, पहिल्या चांद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण; आज इतिहासात...
22 October In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारतीय क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांची जयंती आहे. काकोरी कटात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाक्रानांगल या धरणाचे लोकार्पण केले. तर, भारताकडून पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण आजच्या दिवशी झाले. ही मोहीम भारतीय अंतराळ मोहिमांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. वाचा सविस्तर...
Ishan Kishan and Suryakumar Yadav: टीम इंडियाला दुहेरी झटका; ईशान, सूर्याही आजच्या सामन्यातून बाहेर?
Team India vs New Zealand: वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियानं पहिलं 4 सामने नेत्रदीपक पद्धतीनं जिंकले आहेत. संघाला रविवारी (22 ऑक्टोबर) धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध पाचवा सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशातच आता तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) नेटमध्ये सराव करताना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. तर स्टार फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) मधमाशीनं चावा घेतल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर...
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट! क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेची बाब
एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मधील 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघामध्ये रंगणार आहे. धर्मशाला (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडिअम (Himachal Pradesh Cricket Stadium) मैदानावर दोन्ही संघ आपापसांत भिडणार आहे. चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. वाचा सविस्तर...