(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात किम जोंग उनची एन्ट्री, हमासकडून उत्तर कोरियाच्या हत्यारांचा वापर
North Korean Weapons : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज 16 वा दिवस असून दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.
Israel Gaza Conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) यांच्या संघर्षात आता उत्तर कोरिया (North Korea) चा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याची एन्ट्री झाली आहे. इस्रायल (Israel) विरुद्धच्या युद्धात हमासने उत्तर कोरियाच्या हत्यारांचा (North Korean Weapon) वापर केल्याचं म्हटलं जात आहे. इस्रायली लष्कर (Israel Army) आणि पॅलेस्टाईन (Palestine) ची दहशतवादी संघटना हमास (Hamas) अतिरेकी यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 15 दिवस झाले आहेत. आज 16 व्या दिवशीही या संघर्षाची धग कमी झालेली नाही. अनेक देश हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही देशांनी इस्रायलला तर काही देशांनी पॅलेस्टाईनला समर्थन दिलं आहे.
हमासकडून उत्तर कोरियाच्या शस्त्रांचा वापर
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाच्या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलने जप्त केलेली शस्त्रे आणि हमासचे व्हिडीओ यावरुन स्पष्ट झालं आहे की, उत्तर कोरिया दहशतवादी संघटना हमासला शस्त्रे विकत आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि हमास यांच्यातील संबंध पुन्हा समोर आले आहेत. हमास आणि उत्तर कोरियाचे संबंध खूप जुने आहेत. उत्तर कोरियाने अनेक वेळा हमासला पाठिंबा दिला आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या मुद्द्यावर उत्तर कोरियाने 15 वर्षांपूर्वीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता.
उत्तर कोरियाचा हमासला पाठिंबा
एपीच्या रिपोर्टनुसार, इस्रायलने युद्धभूमीवर हस्तगत केलेल्या हमासच्या शस्त्रास्त्रांचं विश्लेषणही करण्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्करी गुप्तचर संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी माहिती देताना सांगितलं की, हमासचे दहशतवादी F-7 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड वापरत होते, हे खांद्यावरून चालवण्यात येणारे शस्त्र आहे. हे शस्त्र चिलखती वाहनांच्या विरोधात वापरलं जातं. शस्त्र अभ्यासक आणि स्मॉल आर्म्स सर्व्हेचे वरिष्ठ संशोधक मॅट श्रोडर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमास उत्तर कोरियाची शस्त्रे वापरत असून हे पाहणं आश्चर्यकारक नाही. कारण, त्यांचे संबंध फार जुने आहेत.
हमास आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध
हमास आणि उत्तर कोरियाचे संबंध खूप जुने आहेत. उत्तर कोरियाचा फार पूर्वीपासूनच हमासला पाठिंबा आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या मुद्द्यावर उत्तर कोरियाने 15 वर्षांपूर्वीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. यावर हमासचे तत्कालीन प्रवक्ते सामी अबू झुहरी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी उत्तर कोरियाचे आभार मानले होते. उत्तर कोरियाने इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाईनच्या लढ्याला पाठिंबा दिला होता.